"

Ticker

6/recent/ticker-posts

Virat kohli Full Information, Records, Wealth, Wife, Family, House

विराट कोहलीची संपूर्ण माहिती, जीवनप्रवास, पुरस्कार, विक्रम, कुटुंब, संपत्ती सर्व

Virat kohli mahiti marathi- virat kohli life information in marathi

virat kohli mahiti


विराट कोहलीची माहिती- सर्वोत्तम फलंदाज

विराट कोहली नवीन पिढीचा सर्वांत उत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. ऑल टाइम ग्रेटेस्ट बॅट्समन सूचीमध्ये त्याचे नाव घेतले जाते. सचिन तेंडुलकर नंतर भारताचा सर्वोत्तम फलंदाज म्हणून विराट कोहलीचा गौरवाने उल्लेख केला जातो.

विराट कोहलीने 2008 मध्ये क्वालालंपूर येथे आयोजित केलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात भारताचे कर्णधार पद भूषविले आणि भारतीय संघाला विश्वकप जिंकून दिला. तेव्हापासून कोहली आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित करत आहे.

2008 मध्ये लगेचच विराट कोहलीने भारतीय वरिष्ठ संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते. त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे लवकरच त्याला भारतीय संघात नियमित केले गेले आणि २०११ च्या आयसीसी विश्वचषकात त्याला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यावर्षी भारताने विश्वकप जिंकला आणि कोहलीने या स्पर्धेत भारतासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. 

त्याच वर्षी त्याने कसोटी सामन्यात पदार्पण केले. लगेचच पुढच्या वर्षी त्याला एकदिवसीय संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आणि 2014 मध्ये धोनीच्या कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्याला कसोटी कर्णधारपद देण्यात आले. 2017 मध्ये धोनीने एकदिवसीय कर्णधारपदावरुन माघार घेतली आणि विराटला एकदिवसीय संघाचा कर्णधार व्हायची संधी मिळाली

त्याच्या नावावर असंख्य पुरस्कार आणि विक्रम आहेत. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे विराट कोहलीला निश्चितपणे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील अव्वल फलंदाजाच्या लीगमध्ये स्थान दिले जाते.


विराट कोहलीच्या पुरस्कारांची माहिती

2012, 207 आणि 2018 मध्ये विराट कोहलीला आयसीसीचा एकदिवसीय प्लेअर ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आले. 

2017 आणि 2018 मध्ये त्याला  सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी (आयसीसी क्रिकेटर ऑफ दी इयर) देऊन गौरविण्यात आले. 

2018 मध्ये त्याला आयसीसी कसोटी प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कारही मिळाला. 

 2016, 2017 आणि 2018 मध्ये तो विस्डेन लीडिंग- अग्रगण्य क्रिकेटपटू ठरला होता. 

त्याला 2013 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2017 मध्ये पद्मश्री आणि 2018 मध्ये राजीव गांधी खेलरत्न देऊन भारत सरकारने त्याचा गौरव केला.


विराट कोहलीकडे कोणत्याही भारतीय फलंदाजाने मिळविलेले सर्वोत्तम कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी -२० आंतरराष्ट्रीय रेटिंग आहे. तीनही प्रकारात त्याची सरासरी 50 च्या वर आहे. 

कोहली धावांचा पाठलाग करण्यामध्ये मास्टर आहे आणि धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक शतके लागवण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. 


Virat Kohli career information

विराट कोहलीच्या संपूर्ण करिअर विषयी माहिती

डोमेस्टिक करिअर

कोहलीने 1998 मध्ये वेस्ट दिल्ली क्रिकेट अ‍ॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण सुरू केले. त्याच्या वडिलांनी त्याला योग्य ते प्रशिक्षण मिळेल याची तजवीज केली. जिगर आणि चिकाटीच्या जोरावर त्याने सर्वाना प्रभावित केले. 2002 मध्ये त्यांची निवड दिल्ली अंडर -14 संघात झाली. 2003-०4 च्या पॉली उमरीगर करंडक स्पर्धेसाठी तो संघाचा कर्णधार झाला. त्याने अनेक भारतीय स्पर्धा गाजविल्या. सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू म्हणून त्याचा गौरव केला गेला. त्याच्या या दर्जेदार कामगिरीमुळे त्याला 2008 च्या 19 वर्षखालील क्रिकेट विश्वचषक खेळण्यासाठी त्याची निवड झाली, त्या संघाचा त्याला कर्णधार म्हणून नेमण्यात आले. आपली निवड सार्थ ठरवत त्याने भारताला तो विश्वचषक जिंकून दिला.


Virat kohlis international career information

विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय करिअरविषयी माहिती

वनडे करिअर

2008-09-

ऑगस्ट 2008 मध्ये कोहलीने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2008 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्यालाही संघात स्थान देण्यात आले होते पण त्यांना खेळण्याची संधी मिळू शकली नव्हती. जखमी युवराज सिंगच्या जागी त्याने 2009 मध्ये ICC आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली. 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोहलीने पहिले वनडे शतक ठोकले होते. 2010 मध्ये त्याने आशिया चषकातील सर्व सामने खेळले. यावेळी कोहलीने त्याच्या फॉर्मसाठी झगडावे लागले तो . खराब फॉर्म असूनही फलंदाजीच्या कौशल्यामुळे कोहलीला संघात कायम राखण्यात आले. ऑक्टोबर २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कोहलीला सूर गवसला आणि ऑस्ट्रेलियन संघविरुद्ध त्याची कामगिरी चांगली राहिली. २०१० मध्ये तो एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

2011 world cup-

पुढील मालिकेत न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाविरुद्धच्या त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे २०११ च्या विश्वचषक संघाचा तो दावेदार ठरला.  २०११ मध्ये दक्षिण फ्रिकाविरुद्धच्या मालिकेदरम्यान कोहलीला २०११ च्या विश्वकरंडक संघात स्थान देण्यात आले होते. त्याने भारताच्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग म्हूणून प्रत्येक सामना खेळला आणि स्पर्धेत शतक ठोकले आणि विश्वचषकातील अंतिम सामन्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

2012-13-

कोहलीची सातत्यपूर्ण कामगिरी विश्वचषकानंतरही कायम राहिली आणि तो खोऱ्याने धावा जमवत राहिला. २०१२ च्या आशिया चषक स्पर्धेसाठी त्याला संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. कोहलीने  119 च्या सरासरीने 357 धावांनी अग्रगण्य धावा केल्या. कोहलीने 2012 मध्ये केलेल्या कामगिरीसाठी आयसीसीने वर्ल्ड वन डे इलेव्हनमध्ये कोहलीला स्थान दिले. 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोहली संघाचा सदस्य होता. कोहलीने संपूर्ण भारताच्या स्पर्धेतील विजयी मोहिमेमध्ये चांगली फलंदाजी केली आणि या मालिकेचा तो मॅन ऑफ द टूर्नामेंट ठरला .


2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सात सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत कोहलीने वनडेत वेगवान शतक झळकावले होते. त्याने फक्त 52 चेंडूत शतक ठोकले. कोहलीच्या या तुफानी खेळीने भारताला 360 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यास मदत केली, जो एकदिवसीय क्रिकेटमधील दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग होता.

स्पर्धेच्या शेवटी तो आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाज क्रमवारीत अव्वल स्थानावर गेला. त्यानंतरच्या दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत कोहलीने आणखी धावा जमवल्या.

2014-14

 2014 मध्ये त्याने 1054 एकदिवसीय धावा केल्या आणि सौरव गांगुलीनंतर सलग चार कॅलेंडर वर्षात १,००० पेक्षा जास्त वनडे धावा करणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला.2015 च्या विश्वचषकात कोहली छाप पाडण्यात अपयशी ठरला आणि वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाविरूद्ध त्याने केलेल्या शतकाव्यतिरिक्त इतर सामन्यात त्याला धावा करता आल्या नाहीत.

2016
2016 मध्ये कोहलीची चांगली सुरुवात होती कारण त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन बॅक टू बॅक अर्धशतके झळकावली होती. या मालिकेत तो 7000 धावांचा टप्पा पार करणारा वेगवान फलंदाजही ठरला.  2016 मध्ये झालेल्या कामगिरीसाठी कोहलीला आयसीसी वर्ल्ड वन डे इलेव्हनचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले होते.


2017 dream year

2017 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही विराट कोहलीने आपला चांगला फॉर्म कायम राखला. त्याने या स्पर्धेदरम्यान 8000 धावांचा टप्पा गाठला परंतु पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात तो फक्त पाच धावांवर बाद झाल्याने त्याच्या संघाला ट्रॉफी मिळवून देऊ शकला नाही. 2017 मध्ये कोहलीने आपली चांगली कामगिरी सुरू ठेवली आणि वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेविरुद्ध सलग मालिकेत शतके ठोकली. त्याने यावर्षी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून तब्बल 2800 धावा कुटल्या जो भारतीय फलंदजासाठी एक विक्रम ठरल

2018

2018  मध्ये दक्षिण आफ्रिकेत कोहलीने सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये 558 धावा केल्या आणि द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदविला. त्याच वर्षी १०,००० वनडे धावा करणारा कोहली सर्वात वेगवान खेळाडू बनला. 2019 च्या विश्वचषकात कोहलीला आणखी दोन विक्रम केले. 11000 वनडे धावा करणारा वेगवान फलंदाज आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०,००० धावा करणारा वेगवान क्रिकेटपटू असे दोन विक्रम त्याने आपल्या नावे केले.

2019

रोहित शर्माची संपूर्ण माहिती, करिअर, पुरस्कार, विक्रम, कुटुंब, संपत्ती, घर सर्व माहिती

Virat kohli test career- mahiti in marathi

टेस्ट करिअर

२०११ मध्ये कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी  सामन्यात पदार्पण केले होते. कोहलीने पाच कसोटी सामन्यात 76 धावा फटकाविल्यामुळे कोहली त्या मालिकेत प्रभावी ठरला नाही. वेस्ट इंडीजने जेव्हा भारत दौरा केला तेव्हा विराटला अंतिम सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आले आणि पहिल्या डावात अर्धशतक झळकावूनत्याने भारतीय टीमला फॉलोऑन टाळण्यास मदत केली. डिसेंबर २०११ मध्ये ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी कोहलीचा भारताच्या कसोटी संघात समावेश केला गेला.

मालिकेच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात त्याची कामगिरी खराब होती. तिसर्‍या कसोटी सामन्यात त्याने आपला फॉर्म परत मिळविला आणि मालिकेच्या अंतिम कसोटी सामन्यात त्याने पहिले कसोटी शतक झळकावले. भारताने मालिका 4-0 ने गमावली परंतु कोहलीने भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा केल्या.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोहलीची सर्वात खराब कामगिरी झाली. त्याने 10 इनिंगमध्ये केवळ 13.40 च्या सरासरीने केवळ 134 धावा केल्या.विशेषतः जेम्स अँडरसनने ऑफ स्टंप लाइनवर स्विंग बॉल टाकून अनेक वेळा बाद केलं. 

2014 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्‍याच्या पहिल्या सामन्यात कोहलीने पहिल्या सामन्यात शतक झळकावले होते. बॉक्सिंग डे सामन्यात कोहली दोन्ही डावात भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. 2015 मध्ये भारतीय संघाने श्रीलंकेचा दौरा केला तेव्हा कोहलीनेही शतक झळकावले. 2016 च्या वेस्ट इंडीज दौर्‍यामध्ये कोहलीने मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात २०० धावा केल्या आणि भारताला एक डाव आणि  92 धावांनी सामना जिंकण्यास मदत केली.

त्या वर्षाच्या अखेरीस त्याने न्यूझीलंडविरुद्ध आणखी एक द्विशतक लागवले. बांगलादेश आणि इंग्लंडविरुद्धच्या पुढील दोन मालिकांमध्ये कोहली विरुद्ध दुहेरी शतके ठोकण्यात यश आले आणि सलग चार मालिकांमध्ये दुहेरी शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. 

 इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत कोहलीने इंग्लिश भूमीवर पहिले शतक झळकवले. आणि आयसीसी क्रमवारीत पाहिले स्थान पटकावले. 2020 मध्ये कोहली ने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकमेव कसोटी खेळली ज्यामध्ये भारताला दारुण पराभव स्वीकारावा लागला.


Virat kohli T20 career full information

विराट कोहलीच्या T20 करिअरची संपूर्ण माहिती

2010 मध्ये कोहलीने झिम्बाब्वेविरुद्ध टी -२० सामन्यात या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी ट्वेंटी मध्ये पदार्पण केले. 2012 मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोहलीने पहिले टी -२० अर्धशतक झळकावले. 2012 मध्ये आयसीसी वर्ल्ड ट्वेंटी ट्वेंटी मध्ये कोहलीने 5 सामन्यांत दोन अर्धशतकांसह 185  धावा केल्या. त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी 2012 च्या टी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी कोहलीला ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’  देण्यात आले.

2014 मधील पुढच्या टी -२० विश्वचषकात कोहलीने कायमच अव्वल फॉर्ममध्ये राहून टूर्नामेंटच्या उपांत्य फेरीत आपला सर्वोत्कृष्ट टी -२० डाव खेळला. त्याने 44 चेंडूंमध्ये नाबाद 72 धावा केल्या आणि 173 धावांच्या लक्ष्यपर्यंत पोहोचून भारताला अंतिम फेरीत प्रवेश करण्यास मदत केली. 
त्याने या विश्वचषक स्पर्धेत एकूण 319 धावा केल्या, ज्या एका वर्ल्ड ट्वेंटी -२० स्पर्धेत वैयक्तिक फलंदाजाने केलेल्या सर्वोच्च धावा आहेत. 
त्याला मॅन ऑफ द टूर्नामेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि आयसीसीने त्याला टीम ऑफ द टूर्नामेंटमध्येही समाविष्ट केले.

 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौर्‍यादरम्यान कोहलीने टी -२० क्रिकेटमध्ये १,००० धावांचा टप्पा ओलांडला आणि असे करनारा वेगवान फलंदाज ठरला. 2016 च्या आयसीसी वर्ल्ड ट्वेंटी -२० मध्ये कोहलीने 51 चेंडूत नाबाद 82 धावा काढून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. त्याने 5 सामन्यांत 273 धावांनी या स्पर्धेचा शेवट केला आणि वर्ल्ड टी -२० मध्ये त्याला सलग दोन वेळा सामनावीर पुरस्कार जाहीर केला.


विराट कोहलीची माहिती मराठी मध्ये

कर्णधार म्हणून विराट कोहलीची कामगिरी

२०१० मध्ये श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या तिरंगी मालिकेसाठी कोहलीला पहिल्या संघाचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले होते. बांगलादेशमधील आशिया चषक स्पर्धेसाठी २०१२ मध्ये पुन्हा उप-कर्णधार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी कोहलीकडे भविष्यातील कर्णधार म्हणून बोर्डाने आणि निवड समितीने पाहिले होते. 

कर्णधार म्हणून कोहलीचा पहिला वनडे वेस्ट इंडिजमधील त्रिकोणी मालिकेचा पहिला सामना होता.
कर्णधारपदाच्या दुसर्‍या सामन्यात कोहलीने कर्णधार म्हणून पहिले शतक झळकावले. 2013 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्यांदा संपूर्ण मालिकेसाठी कोहलीची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 

एमएस धोनीच्या दुखापतीमुळे कोहलीला 2014 च्या आशिया चषक स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून नेमले गेले. धोनीच्या पुनरागमनानंतर कोहलीला 2014 च्या आयसीसी विश्व टी -२० साठी उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले. कोहलीच्या नेतृत्वात भारताने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत श्रीलंके विरुद्ध पाचही सामने जिंकून निर्भेळ यश मिळविले.


विराट कोहलीची कसोटी क्रिकेट मध्ये कर्णधार म्हणून कामगिरी

Virat Kohli as test captain

डिसेंबर 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीला प्रथमच कसोटी कर्णधार म्हणून नेमण्यात आले होते. कोहलीने आपल्या कसोटी कर्णधारपदी पदार्पणात शतक झळकावले आणि असे करणारा तो चौथा भारतीय ठरला. धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कोहलीची पूर्ण-वेळ कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती केली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कसोटी कर्णधार म्हणून कोहलीने आपल्या पहिल्या तीनही डावात शतक झळकावले असे करणारा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील विराट पहिला फलंदाज ठरला.

 2019 मध्ये, कर्णधार म्हणून  28 वा कसोटी सामना जिंकल्यानंतर कोहली हा सर्वात यशस्वी भारतीय कसोटी कर्णधार ठरला. कर्णधार म्हणून कोहलीची ची चॅम्पियन्स ट्रॉफी प्रथम आयसीसी आयोजित स्पर्धा होती. 2017 मध्ये झालेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी कोहलीला आयसीसीने वर्ल्ड टेस्ट इलेव्हन आणि वनडे इलेव्हन या दोन्ही संघाचा कर्णधार म्हणून गौरवण्यात आले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5-1 एकदिवसीय मालिकेतील विजयानंतर कोहली दक्षिण आफ्रिकेमध्ये एकदिवसीय मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला 2018 मध्येही आयसीसीने कोहलीला वर्ल्ड टेस्ट इलेव्हन आणि वनडे इलेव्हन या दोन्ही संघाचा कर्णधार म्हणून निवडले होते.


विराट कोहलीची माहिती- आयपीएल मधील कामगिरी

Virat kohli - Ipl 

2011 च्या हंगामात कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आणि डॅनियल व्हेटोरीच्या अनुपस्थितीत काही सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्वही केले. 2012 च्या हंगामाच्या शेवटी व्हेटोरीच्या सेवानिवृत्तीनंतर कोहलीची 2013 च्या हंगामासाठी संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2013 हंगामात कोहलीने आपल्या संघाला अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवले पण करंडक उंचावण्यास अपयशी ठरला.


विराट कोहलीच्या कुटुंबाची माहिती

Virat Kohli family information

virat kohli mahiti


विराट कोहलीचे वडील प्रेम कोहली गुन्हेगारी वकील म्हणून काम करत होते आणि त्याची आई सरोज कोहली गृहिणी आहेत. त्याला भाऊ, विकास आणि बहीण भावना असे दोन मोठी भावंडे आहेत. विराटने क्रिकेटमध्ये योग्य प्रशिक्षण घेतले आणि लहानपणापासूनच त्याच्या क्रिकेटला योग्य पाठबळ मिळेल याची खात्री कोहलीच्या वडिलांनी घेतळज. 2006 मध्ये हार्ट अटॅक मुले विराटच्या वडिलांचे निधन झाले. कोहलीने 2017 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी विवाह केला. ऑगस्ट 2020 मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी लवकरच आपण पालक होणार असल्याचे जाहीर केले. आणि जानेवारी 2021 मध्ये त्यांना कण्यारत्नाचा लाभ झाला

विराट कोहलीच्या संपत्ती विषयी माहिती

Virat kohli total wealth- 95million - 650crore rupees

विराट कोहलीची संपूर्ण संपत्तीचे मूल्य तब्बल 650 करोड च्या वर आहे आणि त्यात वेगाने वाढ होत आहे. 2020 च्या आयपीएल जाहिरात आणि मानधन मधून त्याला सुमारे 140 करोड रुपये मिळाले. विराट कोहली सर्वाधिक मानधन घेणारा भारतीय सेलेब्रिटी आहे. त्याच्याकडे खूप सारे ब्रँड आहेत ज्या मध्ये puma, tisssot, Colgate, manyavar, audi, MRF सारख्या अनेक कंपन्यांचा तो ब्रँड अंबसिडर आहे. 










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या