"

Ticker

6/recent/ticker-posts

सचिन तेंडुलकर माहिती, विक्रम, पुरस्कार, कमाई, कुटूंब आणि सर्वकाही

Sachin tendulkar information, awards, records, family, income and everything

सचिन तेंडुलकर चरित्र

सचिन तेंडुलकर यांची संपूर्ण माहिती मराठी मध्ये

सचिन तेंडुलकर हा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पैकी एक आहे. सर्वकालीन महान फलंदाजांमध्ये त्याची गणना होते. भारतात त्याला क्रिकेट मधील देव म्हटले जाते. क्रिकेट मधील महत्वाचे अनेक विक्रम त्याच्या नावे आहेत. त्याला विक्रमांचा बादशाह म्हटले जाते. अनेक वेळा त्याने भारतीय संघाला एकहाती सामने जिंकून दिले आहे. भारतीय क्रिकेट विश्वामध्ये त्याचे स्थान कायम अव्वल राहिले आहे. भारतामध्ये जी क्रिकेटला मोठी लोकप्रियता मिळाली त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा वाटा आहे. 

सचिन रमेश तेंडुलकर हा माजी भारतीय महान क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी महाराष्ट्रातील मुंबई येथे झाला. त्याचे बाबा रमेश तेंडुलकर साहित्यिक होते तर आई रजणी गृहिणी होती. सचिनचा मोठा भाऊ अजित याने सचिनला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले. त्याचा भाऊ अजितनेच पहिल्यांदा सचिन मधील क्रिकेटर पारखला आणि ह्या हिऱ्याला पैलू पाडण्यासाठी अजितने सचिनला आचरेकर सरांच्या कडे क्रिकेटचे धडे घेण्यास पाठवले. यावेळी सचिनने काही काळ आपल्या काकाकडे वास्तव्य केले कारण खेळाचे मैदान तेथून जवळ होते. त्याच्या काकांनी त्याचे पोटच्या मुलाप्रमाणे संगोपन केले. 


 जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याला गौरविले जाते. सचिन हा उजव्या हाताचा सलामीवीर फलंदाज होता आणि त्याने सुरवातीला मधल्या फळीतही भारताला  योगदान दिले. कसोटी तसेच वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. व्हाइट बॉल गेममध्ये म्हणजे एकदिवसीय सामन्यात दुहेरी शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज होता. त्याने त्याच्या सदाबहार कारकिर्दीत अनेक विक्रम केले, आपल्या दोन दशकाहुन ऐहिक मोठ्या कारकिर्दीत त्याने तब्बल २०० कसोटी सामने खेळले. त्याच्या नावावर तब्बल १०० अतंराष्ट्रीय शतके आहेत. 

कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा, दोन फॉर्मेटमधील सर्वाधिक शतके आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतके - जवळपास सर्व विक्रम सचिनच्या नावे आहेेेत.

Sachin tendulkar information in marathi 

पार्श्वभूमी
रमाकांत आचरेकर यांच्या अंतर्गत शालेय काळात सचिनचे प्रशिक्षण झाले होते. आश्चर्य कारक गोष्ट म्हणजे वेगवान गोलंदाज म्हणून प्रशिक्षणासाठी त्याने चेन्नईच्या एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये प्रवेश घेतला परंतु ऑस्ट्रेलियन महान गोलंदाज डेनिस लिलीच्या सल्ल्यानुसार त्याने फलंदाजीच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेगवान गोलंदाजी सोडली. आणि हाच त्याचा निर्णय त्याचे भाग्य चमकवून गेला आणि जगाला क्रिकेट मधील सार्वकालीन महान क्रिकेटपटू सापडला. 


पदार्पण
१९८९  मध्ये भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध सचिनने वयाच्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १६ वर्षाच्या कोवळ्या वयात त्याला वकार युनिस, वासिम अक्रम, अब्दुल कादिर यांच्यासारख्या महान भेदक गोलंदाजांचा सामना करावा लागला. पहिल्या डावात १५ धावावर त्याला विकार युनूस ने त्रिफळाचित केले. पुढच्या कसोटीत त्याने सुंदर फलंदाजीचे दर्शन घडवत अर्धशतक झळकावले. 

त्याच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये पाकिस्तानच्या विरुद्ध वकारने शून्यावर सचिनला बाद केले.


उदय ते वैभव

सचिन निर्दोष फूटवर्क आणि टायमिंगसह आक्रमक फलंदाजी साठी प्रख्यात होता. त्याने  शालेय लीग मध्ये खोऱ्याने धावा केल्या आणि भारतीय संघ व्यवस्थापणाचे लक्ष वेधून घेतले.


1988-89 रणजीच्या रणजी मोसमात त्याने सर्वाधिक 67 च्या सरासरीने  583 धावा केल्या. 1990-1991 रणजी करंडकातील अंतिम सामन्यात त्याने हरियाणाविरूद्ध 75 चेंडूत 96 धावांची खेळी. 
त्याने इंग्लंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड येथे पााहिलं कसोटी शतक झळकावले,  आपल्या संघाला पराभवापासून वाचवले आणि कसोटी शतक ठोकणारा दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला. 1992 मध्ये त्याने सिडनी येथे जलद आणि भेेेदक ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध नाबाद 148 धावा केल्यामुळे संघात स्थान निश्चित झाले.


लो पॉइंट

कर्णधार


 1996 मध्ये अझरुद्दीननंतर भारतीय संघाचा कर्णधार म्हणून सचिनची नेमणूक झाली. तथापि, तो कर्णधार म्हणून बर्‍यापैकी अयशस्वी ठरला. २००१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडूच्या शिवणात छेडछाड केल्याचा दोषी आढळल्यानंतर त्याला एक कसोटी सामन्यावर बंदी देण्यात आली होती.

तर ही होती सचिन तेंडुलकर यांची संपूर्ण माहिती आपल्या मराठी मध्ये तसेच या वेबसाईट वर विराट कोहलीची माहिती आहे ती नक्की वाचा.



क्रमवारीत सचिनची नोंद

फलंदाजीच्या इतिहासात सचिनच्या नावे जवळपास सर्व विक्रम आहेत. त्याने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनुक्रमे 15921 आणि 18426 धावा जमवल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30000 पेक्षा अधिक धावा करणारा एकमेव खेळाडू आहे.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे, ज्याची एकूण 100 शतके आहेत. त्याने भारतासाठी सर्वाधिक 200 कसोटी सामने खेळले. एकदिवसीय इतिहासात दुहेरी शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज होता.


1992 मध्ये त्याने यॉर्कशायरचे प्रतिनिधित्व केले. 16 प्रथम श्रेणी सामन्यात 46 च्या सरासरीने 1070 धावा केल्या.


2008- 2013 दरम्यान इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आणि एका शतकासह १२० च्या स्ट्राईक रेटने 2334 धावा केल्या.

सचिन तेंडुलकर माहिती मराठी मध्ये




२०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध खराब कामगिरीनंतर त्याने मर्यादित षटकांच्या फॉर्ममधून निवृत्तीची घोषणा केली. तो कसोटी क्रिकेट खेळत राहिला. वेस्ट इंडीज विरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळल्यानंतर त्याने 2013 मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील होम ग्राऊंड येथे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या