"

Ticker

6/recent/ticker-posts

अर्थासह गणपतीची आरती- aarti ganpati, aarti sangrah, aarti of ganesh, aarti of ganpati, marathi aaratya, ganpatichi aarati,stotra

अर्थासह  गणपतीची  आरती 

सुखकर्ता दुखहर्ताची तीन कडवी आहेत, प्रत्येक कडव्यानंतर धृपद म्हटले जाते.
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥
अर्थ : गणपती कसा सुख आणतो व दु:ख दूर करतो, ह्याने होते. पुढे गणपती कसा भक्ताचे जीवन प्रेमाने भरुन टाकतो ह्याचे वर्णन केलेले आहे. साप्ताहिक ’लोकप्रभ”त विदित केल्याप्रमाणे, ह्या कडव्यातील नुरवी हा शब्द नुर्वी म्हणुन अनेकदा चुकीचा उच्चारला जातो.




जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पूर्ती ॥धृ॥
ह्या कडव्यात गणपतीचे मंगलमूर्ती म्हणून वर्णन केले गेले आहे. या देवाचे केवळ दर्शन हे आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते, असे सांगितले आहे.
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी, कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|

जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मन कामना पूर्ती ॥२ ॥
या दुसर्‍या कडव्यात गणपतीचे गौरी (पार्वती) पुत्र म्हणून वर्णन आहे. भर्पूर रत्‍ने असलेला फरा (एक दागिना) लावलेले त्याचे कपाळ चंदन, कुंकू, व केशर यांनी चोपडलेले आहे व तो हि्र्‍याचे मुकुट व वाजणारे दागिने घालतो, असे वर्णन केलेले आहे.
लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|

जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पूर्ती ॥३॥
शेवटचं कडवं हे गणपतीचे मडक्यासारखे पोट असल्याचे वर्णन करते. त्याने पितांबर नेसला आहे. त्याच्या कंबरेभोवती एका नागाचा बंध (कंबरपट्टा) आहे. या गणपतीला तीन डोळे असून त्याचे तोंड वाकडे पण सोंड सरळ आहे. गणपतीच्या मूर्तीला सहसा तिसरा डोळा नसतो, पण मोरगावच्या गणपतीला तो आहे. शेवटी, कवीचे नाव आहे, व दास रामदास हा देवाची वाट पाहतो आहे, असा उल्लेख आहे. ह्या कडव्यात गणपतीला, भक्त संकटात असतांना त्याला प्रसन्न होण्याची, व अखेरच्या क्षणी रक्षण करण्याची विनंती केली गेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या