"

Ticker

6/recent/ticker-posts

Bayko Kavita in marathi बायकोवरील मराठी कविता

 Bayko Kavita |बायको कविता । Bayko Kavita in Marathi

हलक्या फुलक्या विनोदी बायको कविता- प्रेम कविता


Bayko-kavita



Bayko kavita- बायको वर कविता हव्या असतील तर तुम्ही योग्य जागी आला आहात. Bayko kavita in marathi  या पोस्ट द्वारे आम्ही बायकोसाठी सुंदर कविता तुमच्या पर्यंत पोहोचवत आहोत. आपल्या बायकोला ह्या सुंदर कविता तुम्ही समर्पित करू शकता. ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला हलक्या फुलक्या विनोदी बायको कविता, प्रेमात आकंठ बुडालेल्या उभातांसाठी अलवार हळव्या प्रेम कविता तसेच तक्रार करणाऱ्या तेवढंच प्रेम दर्शवणाऱ्या खोडकर बायको कविता आम्ही घेऊन आलो आहोत



बायको कविता- बायको म्हणजे बायको असते


बायको म्हणजे बायको असते....
ती जेव्हा घरी असते... तेव्हा
तिच्याशी जमत नाही...
ती जेव्हा घरी नसते... तेव्हा
तिच्याविना मन रमत नाही...
असं म्हणतात बायको जर नसेल...
तर राजवाडा पण सुना आहे...
बायकोला रागावणं खरंच...
मोठा गुन्हा आहे...
खरं सांगितलं तर बायकोशिवाय...
नवऱ्याचं पानही हलत नाही...
घरातलं कुठलंच सुख तिच्याशिवाय
दारी येत नाही... बायको असते लक्ष्मी...
जिच्याशिवाय संसार फुलत नाही...
नोकरी आणि पगाराव्यतिरिक्त...
नवऱ्याकडे आहे तरी काय?
नवऱ्याची बायकोशी तुलना केली तर
नवऱ्याला जमतं तरी काय?
तिचा दोष काय बिचारीचा?
तर म्हणे... मौजमजा, मित्रांमध्ये...
पार्ट्या करायला रोखते...
अहो तुमच्यावर मरते... म्हणून
तुमची काळजी करते...
घरात कोणाची वस्तू कोठे आहे?
Bankbook, Locker चाव्या...
कुणाचा birthday कधी आहे?
साऱ्यांची नोंद तिच्या डोक्यात
पक्की असते
खूप सोज्वळ व caring असते...



बायको कविता-भांडखोर तापट सायको



खूप लोकांनी मांडली व्याख्या, त्यांच्या त्यांच्या अनुभवाने.
वर्णन अस करून ठेवलंय, भीती वाटते फक्त नावाने.
काहींनी सकारात्मक तर, काहींनी लिहिलंय नकारात्मक मनाने.
महत्व काय आहे तिचे, कित्येकदा दाखवलय इतिहासाने.
कुणी गंमतीत मांडलं तर, कुणी संशयाने मांडलं या नात्याला.
आयुष्याची सोबत असते, मग सुख दुःख सगळं तिच्या वाट्याला.
तारुण्यात प्रवेश करते आयुष्यात, साथ देण्या शेवटपर्यंत.
मरणोत्तर ही नातं जपते, अगदी तिचा श्वास संपेपर्यंत.
किती तरी वेळा भांडतो रडतो, आणी चिडवतोही तिला.
कितीही नकोशी झाली तरी, लांब गेली की करमत नाही मला.
लोकांनी वर्णन केलय, आहे ती भांडखोर तापट सायको.
आज तिच्याबद्दल लिहितोय, जी आहे माझी बायको.



bayko kavita in marathi- माझी अर्धांगिनी


तूच सखी तूच राधा
तूच माझी राणी तूच माझे स्वप्न
आहेस माझा श्वास तू
तूच आहे माझी अर्धांगिनी
आहे माझी एक मनिषा
अश्रू ना यावे तुझे नयनी
सोबत तुझी अशीच घडावी
तूच आहे माझी अर्धांगिनी
तुझीच स्वप्नं पडते नयनी
सातो जन्मी तूच माझ्यासाठी
हीच आस आहे मनी
गातो जीवनाचे गीत तुझ्यासाठी
नाही कसलीच हानी मला
तूच राहे सात जन्माची सावित्री
तुजवीण जीवन होईल अधुरे
तूच आहे माझी अर्धांगिन



बायको कविता- प्रेमळ सहवास


नाते प्रेमाचे तुझे नि माझे
नात्यात अपुल्या हृदय गुंतते
संगतीने तुझ्या मन माझे नाचे
जसे काही वाऱ्यासह गवताचे नाते
नजरेत तुझ्या आहे अजब जादू
नयनांनी मनाचा संवाद साधू
स्पर्शात तुझ्या मन माझे मोहरुन जाई
हृदयात माझ्या आनंदाचा संचार होई
स्पर्शात तुझ्या आहे वेगळी नशा
जणू कळीला दवबिंदू पाहे ना
नात्यात असे सर्वोच्च प्रेमाचे नाते
तुझ्या प्रेमाचं गणित आज मला कळेना
नाते हे प्रेमाचे आहे नाही दुसरे
असावा असा निर्मळ सहवास
आपण वसू आपल्या प्रेमाच्या घरात
तिथे असावा आपला प्रेमळ सहवास

Bayko-kavita




bayko kavita in marathi-संसाराचे गीत



दिवाळी च्या सणात मिळाली मला अनोखी भेट
माझ्या आयुष्यात त्याच्या येण्याने जीवन झाले सेट
कधी कशी हो प्रीत जडली काही मला उमजले नाही
हळूच कधी मी त्याची झाले मला हे कळेच नाही
त्याच्या वागण्या बोलण्याने माझ्या मनावर जादू केली
त्याच्या सहवासात मी जगाला पुरते विसरून गेली सोबतीची झाली
इतकी सवय की वेळ संपू नये असे नेहमीच वाटत राही
चालताना त्याच्या सोबत मन पाखरा सम उडत राही
वेड्या मनाला माझ्या असे त्याच्याच सोबतीचे वेध
नजरेत असे जादू त्याच्या करी माझ्या हृदयचा भेद
त्याच्या जवळ असण्याने लागली मला पुन्हा नव्याने जगण्याची आस
तो दूर जरी गेला तरी होई सतत मला त्याचाच भास
दिवसागणिक बहरात गेली अशी आमची जगावेगळी प्रीत
माझ्या लेखणीचे शब्द बनो आमच्या सुंदर संसाराचे गीत



बायको कविता-बायको ने बायको सारखे राहावे



बायको ने बायको सारखे राहावे
घराचे घरपण जपावे,
साजशृंगार करूनी
प्रसन्न चित्ती असावे....१
दिनराती कष्ट करावे
घर स्वच्छ ठेवावे,
नवरा बाहेरून येता,मधाळ गोड हसावे
बायको ने बायको सारखे राहावे....२
सुग्रास भोजन करावे
तिचा हातखंड कोणी ना धरावे
पाहुण्यांचे स्वागत हसत मुखाने करावे
कारण, बायको ने बायको सारखे राहावे....३
मुलांचा सांभाळ करावे
कोणी सांभाळ करावे
कोणी आजारी पडले तर
काय हवे नको ते पहावे,
ना कोणाला टोचून बोलावे......४
नुसते कळसुत्री बाहुली परी काम करावे
चाबी भरलेल्या यांत्रिक बाहुली परी
बायको ने बायको सारखे राहावे....५
बायको ने कधी नसते
आजारी पडायचे,पडली तरी
सारे काम तिनेच करावे
नंतर मग आराम करावे.....६
बायको सुद्धा असते मानव
नाही ती कळसुत्री बाहुली
जरा मानवता दाखवून घरी
मग, सांग तु बायको ने बायको सारखे राहावे
ती असतेच तुझ्या शब्दाखाली.....७
थोडे प्रेमाने बोल खरी
ती तुझीच असता, नको समजू तू
यांत्रिक तिज बाहुली
तेव्हाच संसार सुखी होईल खरी....८


also read


bayko kavita in marathi-बायको थोडीशी सायको 




बायको मिळाली, 
थोडीशी सायको मिळाली.
पण नशिबाने बायको मिळाली. 
थोडीशी नकटी,
थोडीशी चपटी,
चालण्यात लकटी,
बोलण्यात कपटी.
थोडीशी बडबडी 
थोडीशी कटकटी मिळाली.
बायको मिळाली, 
थोडीशी सायको मिळाली.
डोळ्याने थोडीशी कानी,
ऐकू कमी येई कानी.
थोडीशी वाकड मानी,
समझे स्वत:ला इंग्लंडची राणी.
थोडीशी वेडी,
थोडीशी शहाणी मिळाली.
बायको मिळाली, 
थोडीशी सायको मिळाली.
चालतांना खाते हेल,
बोलायला जणू हावडा मेल.
भांडायला लागल्यावर क्रीस गेल, 
भडकल्यावर रॉकेल तेल.
अडाणी, गावंढळ, चौथी फेल मिळाली. 
बायको मिळाली, 
थोडीशी सायको मिळाली.
आजच्या जमान्यात 
जेथे मुलींना गर्भाशयातच मारल जातयं
मुलींना हे जग
पाहू नाही दिलं जातंय.
तेथे कशी का असेना 
एक बायको मिळाली,
हीच मोठी किमया झाली.
बायको मिळाली, 
थोडीशी सायको मिळाली.

Bayko-kavita



बायको कविता-बायको म्हणजे


बायको म्हणजे------
धागा रेशीम बंधाचा
आधार घर धन्याचा
पान्हा तान्हया लेकरचा
सागर प्रेम वात्सल्याचा
श्वास जोडीदाराच्या प्रेमाचा
पदर मायेच्या उबेचा
पाय गृह लक्ष्मीचा
ताळेबंध संसाराचा
ओढा वाहणाऱ्या प्रेमाचा
घास खरपूस भाकरीचा
नाजूक तुकडा काळजाचा
खंबीर साथीदार सहजीवनाचा



माझी बायको


सरळ आणि साधी अशी माझी बायको
वाटत जरी असली तरी आहे सायको
प्रेम करते भरपूर यात काही वाद नाही
कामं तिचे फास्ट फास्ट तिचा जवाब नाही
कधी वाटते बाळ छोटं हट्ट तिचे भलते
डिमांड लहानश्या तिच्या खर्च कमीच करते
जबाबदाऱ्या तिच्यासाठी खूप आहे गंभीर
दुःखात माझ्या सोबत असते सदैवं खंबीर
राग तिचा छोटा मोठा मस्ती लय भारी
रागात मात्र सारखा तिचा राडा असतो जारी
गुणाची सखी माझी कशातही कमी नाही
साम दाम दंड भेद कशाचीही हमी नाही
उदार मनाची तिला कुणाचाही द्वेष नाही
अजूनही तिच्यामध्ये दिसला काही दोष नाही
अजूनही तिच्यामध्ये दिसला काही दोष नाही



आशा आहे तुम्हाला या bayko kavita आवडल्या असतील. या ब्लॉग वरील प्रेम कविता, पाऊस कविता वाचायला विसरू नका.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या