"

Ticker

6/recent/ticker-posts

25 best marathi books to read- सर्वाधिक खपाची मराठी पुस्तके

best Marathi books for reading - सर्वोत्तम मराठी पुस्तके 



Marathi best selling books

मराठी भाषेला अनेक महान साहित्यिक लाभले. ज्यांनी आपल्या साहित्यकृतींनी मराठीची पताका सातासमुद्रापार पोहोचवली. मराठीतील ऐतिहासिक historical novels in marathi कादंबरीचा मोठा वाचकवर्ग आहे. त्यांची वाचनतृष्णा भागविण्यासाठी अनेक लेखक पुढे आले आणि अभिजात साहित्यकृतींची निर्मिती झाली. मराठीतील अशाच महान साहित्यकृतींची माहिती( best marathi books an novels) आज या पोस्ट द्वारे आम्ही तुम्हाला देणार आहोत. ही पुस्तकें प्रत्येक मराठी वाचकाने वाचली पाहिजेत- best marathi books to read आणि तसेच त्यांच्या संग्रहि देखील असली पाहिजेत. प्रत्येक पुस्तकांतर लिंक दिली आहे किंवा सुरुवातीला मुखपुष्ट दिले आहे यावर क्लिक करून तुम्ही तुमची प्रत मागवू शकता

here is list of some of the best books in marathi. every maharshtriyan should read these best selling marathi books. with every book there are links to order the books, you can order your favourite marathi book by clicking on the cover of the book or link. 




best marathi books list 



१ दुनियादारी- सुहास शिरवळकर



 
पुस्तक चांगलं असणं,पुस्तक आवडणं /नावडणं,पुस्तक बेहद्द आवडणं ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत."दुनियादारी"ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मनात घर करून राहिलेली कादंबरी आहे. पुस्तकात काय आहे हे सागायला शब्द मिळत नाहीत इतकी ती खोल विचार करायला लावते,तिच्याबरोबर जगायला लावते,अनुभवायला लावते." लावते" हा शब्दच योग्य आहे कारण एकदा का ती वाचायला सुरुवात केली आपण गुंतत जातो,एवढे कि त्यातून बाहेर पडण कठीण होऊन जातं.कथानकाचा काळ जरी अगदी आजचा नसला तरी

ही आहे एक काल्पनिक सत्यकथा !तुमची, माझी, आपल्या मित्रांची.घराघरांतून नित्य घडत असणारी.म्हणूनच,
जोपर्यंत दोस्ती-यारी, दुष्मनी,आनंद-दुख,प्रेम - मत्सर ... या भावना मानवी मनात
अनंत आहेत ; जोपर्यंत दोन पिढ्यांमध्येमानसिक अंतर आहे, तोपर्यंतही काल्पनिक, परंतु प्रातिनिधिक असलेली सत्यकथा अमर आहे.

सु शि नि वयाच्या केवळ २४व्या वर्षी लिहिलेली मास्टर पीस कादंबरी.ती वाचताना आपण त्यातील पात्रांशी एवढे एकरूप होऊन जातो कि त्यातील काही पात्रांमध्ये आपण स्वताला पाहतो तर काहीमध्ये आपल्या मित्रांना तर काहीमध्ये आपल्या नातेवाईकांना .पात्र एवढी जिवंत कि कुणा न कुणाची तरी आठवण व्हावीच.

श्रेयस तळवलकर हा साधा सालस निरागस कॉलेजमध्ये नुकताच जाऊ लागलेला कथानायक (तस कथानायक नाही म्हणू शकत दिग्या ,MK ,राणीमा,मिनू सगळेच कथानायक).sp कॉलेज ,dsp उर्फ दिग्या ,mk ,शिरीन,मिनू,राणी मां ,नितीन अश्य्क्या ,साईनाथ ह्या सगळ्याबरोबर त्याचा आयुष्य पुढे सरकत व दुनियादारी माहित नसलेला श्रेयस त्याच दुनियादारीत कसा जगतो ,रमतो ते लेखकाने अक्षरशः जिवंत केलय.

एक एक पात्रांबद्दल लिहायला लागल्यास पानेच्या पाने पुरनार नाहीत पण पुस्तक वाचून जो अनुभव येईल तो नाही देता येणार.मित्रांसाठी जीव टाकणारा ,चार फटके द्यायची व घ्याच्यची हिम्मत असणारा बिनधास्त ,निरागस,बेताल ,निर्भीड दिग्या मनाला चटका लावतो.

MK च पात्रं ,त्याचे श्रेयस शी संवाद ,एके काळी प्रेम केलेल्या व ती न मिळाल्यामुळे सगळा आयुष्य दारूच आपली सोबती असा जगणाऱ्या ,जगण्याची भन्नाट philosophy सांगणाऱ्या mk च्या बेवडा असूनही आपण त्याच्या प्रेमात पडतो.

कट्ट्यावरचे अवली मित्र,समंजस मैत्रीण ,न आवडणारा पण बेहद्द प्रेम करणारा नवरा असूनही आयुष्यातला काहीतरी राहून गेल्यामुळे दुखी असलेली राणीमा सगळेच बेस्ट.प्रत्येकजण आपापल्या जागी कधी बरोबर कधी चूक एकंदरीत ज्याच्या त्याच्या दृष्टीने बरोबरच.

हसायला तितकीच रडायला लावणारी हि कादंबरी कित्येक वर्षांनी क्वाचली तरी तितकीच भावते,आवडते,हसवते व रडवतेहि !!!!!!!

दिग्या, श्रेयस, नितीन, अश्क्या, साईनाथ, प्रीतम, शिरीन, मिनू, राणी मां आणि एम्‌.के.’दुनियादारी’तली ही पात्र ज्यांच्यामुळ निर्माण झाली,त्या ’कट्टा गँग’ला- -सुहास शिरवळकर

त्या सर्व वाचकांना,ज्यांनी 'दुनियादारी'विकत घेतली;वाचनालयातून वाचली;मित्राची ढापली;वाचनालयाची पळवली...पण 'दुनियादारी'वर मनापासून प्रेमच केलं!त्यांनाही,ज्यांनी "दुनियादारी"च्या लोकप्रियतेचा मनापासून द्वेष केला!आणि....खेडं, गाव, शहर, नगर, व महानगरातील तमाम 'कट्टा-गँग्ज'ना,ज्या"दुनियादारी" जगल्या..जगतात...जगतील
तुमची प्रत आजच खरेदी करा


 




best Marathi book about nature- 

२ रानवाटा: मारुती चितमपल्ली



 
 निसर्गाविषयी ललित लेखनाचे हे पुस्तक. पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांनी  महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात अनेक महत्वाच्या पदावर कार्य केलेय .वन्यजीव व्यवस्थापन ,वने,वन्य प्राणी व पक्शिजागाताविषयी उल्लेखनीय संशोधन त्यांनी केलेले आहे.
         ह्या पुस्तकामधील बरेच लेख जुन्या दिवाळी मासिकांमध्ये छापले गेलेले आहेत(१९८५,८४,७७ ई सालात ).पुस्तकामधील सगळेच लेखन अप्रतिम व वाचनीय.निसर्गवेड्या माणसाला /वाचकांना अजून काय हवे.जे जे आपण प्रत्यक्ष जंगलात जाऊन अनुभवू शकणार नाही किंवा सामान्य माणसाला अनुभवता येणार नाही असे त्यांना आलेले अनुभव त्यांनी कथन केलेले आहेत.तनमोराचे दिवस,धन्चीडी,रानातली घरं,पाडस,इटीया  डोहातील हुदाळे,शाल्मली,पक्षी निरीक्षण ,पांगारा,वन्यजीव निरीक्षणाची  किमया व अरण्य वाचन असे एकाहून एक सरस लेख ह्या पुस्तकात आहेत.कदाचित नावावरून  काही जणांना काहीच कळणार नाही पण वाचताना हे सगळे अनुभव आपल्याला थेट जंगलात घेऊन जातात.जंगलाच्या जादुई दुनियेची ओळख करून देतात.तशी त्यांची सगळीच पुस्तके मस्ट रीड आहेत.
    ह्या पुस्तकाला ९१-९२ सालचा उत्कृष्ट साहित्यानिर्मितीचा राज्य पुरस्कार,भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार,मृण्मयी साहित्य पुरस्कार मिळालेले आहेत.



तुमची प्रत आजच खरेदी करा
 


 

best Marathi books to read before you die




३ श्रीमान योगी- रणजित देसाई



राष्ट्रवाद आणि हिंदू संस्कृतीच्या पुनरुज्जीवनावर शिवाजींचा मोठा प्रभाव होता ज्या काळात मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी शतकानुशतके राज्य केले तेव्हा लोकांमध्ये औदासिनता आणि उदासीनता निर्माण झाली.

वर्षानुवर्षे शिवाजीच्या जीवनात अनेक आख्यायिका जोडल्या गेल्या आहेत आणि या अलंकारांचे फिल्टरिंग करणे आणि फक्त वस्तुस्थितीवर लक्ष केंद्रित करणे कठीण आहे.

हे तथ्य केवळ तथ्यांनुसार तयार करण्यासाठी लेखकाने प्रयत्न केले आहेत. या कल्पित राजाच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यासाठी एकटे तथ्य पुरेसे रंजक आहेत.

शिवाजी एक माणूस होता ज्याने काहीही न सुरू करता राजवंश बांधला. त्यांची प्रेरणा नेहमीच त्यांच्या संस्कृतीत आणि आपल्या मातृभूमीवर असलेल्या प्रेमाबद्दल अफाट अभिमान बाळगतात. तथापि, तो धर्मांध नव्हता आणि त्याने आपल्या सर्व विषयांचा धर्म आणि इतर विभागांकडे दुर्लक्ष करून समान वागणूक दिली. त्याची लढाई बहुधा मुस्लिम राज्यकर्त्यांशी होती, परंतु त्याने आपल्या राज्यातल्या मुस्लिम रहिवाशांबद्दल कधीही वैरभाव दाखविला नाही.

शिवाजी जसा होता तसाच लेखकाने सादर केला आहे, त्यावर कोणत्याही प्रकारची शोभेची वस्तू नाहीत. शिवाजी एक गतिशील नेते, योद्धा आणि खानदानी होते. तो धर्मांध न होता धार्मिक होता, तो विश्वास होता, पण अंधश्रद्ध नाही, तो धैर्यवान होता पण मूर्ख नव्हता. मुस्लिम राजवंशांनी वेढलेल्या प्रदेशात हिंदू राज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहणारे ते एक स्वप्नवत होते. तरीही तो अत्यंत व्यावहारिक होता.

शिवाजी एक धाडसी योद्धा आणि एक उत्तम युक्ती होता. त्याच वेळी, तो एक चांगला प्रशासक देखील होता आणि त्याने बनविलेले राज्य त्याच्या राजवटीत अधिक मजबूत बनले. त्याने बर्‍याच पराभवांनाही सामोरे जावे लागले, परंतु त्याने कधीही आपला दृष्टि सोडला नाही आणि शेवटी, स्वप्न सत्यात उतरविण्यात त्याला यश आले.

या परंपरेत योगदान देणार्‍या शिवाजींच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू लेखकाने या पुस्तकात आत्मसात केले आहेत आणि अशा रीतीने या कथेत घडणाऱ्या घटनांमध्ये वाचकाला सामील होण्याची भावना दिली आहे. तुमची प्रत आजच खरेदी करा. मुखपृष्ठावर क्लिक करा



तुमची प्रत आजच खरेदी करा

.







४ पार्टनर--व पु काळे 

 
  
वपुचं मास्टरपीस म्हणून ओळखल जाणारं पुस्तक..श्री पार्टनर ह्या नावानेी ह्या पुस्तकावर आधारित मराठी सिनेमा देखील प्रदर्शित झालाय.मध्यमवर्गीय श्री ,त्याचा मित्र पार्टनर व श्रीची पत्नी किरण हि मध्यवती पत्र व त्यांची कथा.साधारण मध्यमवर्गीय  माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना व पु नि छान रंगवल्या आहेत .पार्टनर व श्री चे सवांद अप्रतिम .शेवट अंगावर येतो .पुस्तक एकूणच अप्रतिम.व पुं चे  वपुर्झा ज्यांनी वाचले  तर त्यासारखी वाक्ये प्रत्येक पानावर येतात.अशी अप्रतिम वाक्ये लिहिणारा व पुं  शिवाय माझ्या तरी पाहण्यात नाही .काही वाक्ये इथे देत आहे
>माणसाची नजर ज्या वस्तूकडे असते ,तीच वस्तू त्याला पहायची आहे ,तसं त्या माणसाकडे पाहणाऱ्या इतरांना वाटतं
>अंधारात भिंती दिसत नाहीत ,आखून बांधलेल्या खोल्या अमर्याद आकार धारण करतात ,त्यात हरवून जायला सोप जातं .
>कायम आजारी असलेल्या माणसाला जेव्हा ईतर कंटाळतात तेव्हा  त्याचा तो किती कंटाळलेला असतो हे इतरांच्या लक्षातही येत नाही .माणसाच स्वताच्याच कंटाळ्यावर प्रेम असतं.
> आपल्याला हवा तेव्हा  तिसरा माणूस न जाणे  हाच नरक. 

मानवी जीवनाचा हा अभिजात स्वर आहे. हे पुस्तक आपल्याला विविध मानवी संबंधांचे स्वरूप सांगते आणि प्रत्येक मनुष्याचे आयुष्य पुढे आणते. हे माणसाच्या जवळजवळ प्रत्येक संबंध दर्शवते.
साधे सोपे कथानक आणि तशीच साधी पण जबरदस्त लेखनशैली यामुळे हे पुस्तक वेगळी उंची गाठते.
मुखपृष्ठावर क्लीक करून आजच आपली प्रत विकत घ्या.


तुमची प्रत आजच खरेदी करा






५ शाळा -मिलिंद बोकील


 २०१२ मध्ये शाळा चित्रपट (ह्या पुस्तकावर आधारित )आल्यामुळे ह्या वर्षी पुन्हा एकदा ह्या पुस्तकाची जोरदार चर्चा झाली .२००३ साली प्रकाशित झालेला हे पुस्तक प्रचंड लोकप्रिय झालंय.चित्रपट म्हणजे केवळ मुळ  कथेला ५०% च न्याय दिलाय अस माझ वैयक्तिक मत आहे.
   पुस्तकाची भाषा अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे.नववी त शिकणाऱ्या एका मुलाची हि कथा ७०-८० च्या दशकात घडलेली डोंबिवली मध्ये .त्या वेळे तरी डोंबिवली गावच होत.या वयात आणि त्या काळात जे काहि एखाद्या किशोरवयीन विद्यार्थ्याच्या बाबतीत  घडु शकेल त्याची जबरदस्त कहाणी म्हणजे शाळा .पुस्तक कुठेहि  खोटे वाटत नाही.सगळी पात्रे आपल्यासमोरच उभी आहेत असे वाटते.सर्व लेखन एकदम ओघवत्या भाषेत .सुममधे, डाऊट खाणे,  लाईन देणे ,इचीभन असे काहि खास शब्द लेखकाने वापरले आहेत.पुस्तकातली पात्र  म्हणजे मुकुंद , सुर्‍या, चित्र्या, सुकडी, केवडा,नरु मामा ,बहिण अंबाबाई सगळी पात्र झकास.पुस्तक एक उत्तम वाचनीय अनुभव.
            मुकुंद जोशी ची नववीतील हि कहाणी मग त्यात मित्र आहेत ,प्रेम आहे ,मस्ती आहे ,शिव्या आहेत,तत्कालीन परिस्तिथी चा वर्णन आहे , प्रेमासाठी केलेले उपद्व्याप आहेत ,नंतरची विलक्षण हुरहूर आहे.पुस्तक संपता संपता आपण पण मुकुंद जोशी आपलाच कुणी आहे असे समजू लागतो. शाळेत गेलेल्या प्रत्येकाने शाळा हे पुस्तक वाचलेच पाहिजे

तुमची प्रत आजच खरेदी करा

मुखपृष्ठावर क्लीक करून आजच आपली प्रत विकत घ्या.

  



६ यक्षांची देणगी -जयंत नारळीकर 





 जयंत नारळीकर हे नावाजलेले वैज्ञानिक व लेखकही. त्यांच्या मते विज्ञानाची माहिती आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा प्रचार आवश्यक आहे अनेक माध्यमे उपलब्ध असली तरीही वैज्ञानिकांमध्ये ह्याबाबतीत उदासीनता दिसून येते. प्रस्तावनेत त्यांनी लिहिलेय कि "विज्ञानाची गोळी जर कडू लागत असेल तर त्याला साखरेचे कोटिंग म्हणजे कथेचे रुपं देणे योग्य ठरेल. विज्ञानकथा अशा उद्देशाने लिहिल्या जाव्यात असे मला वाटते व निदान मी लिहितो त्या कथा तरी ह्याच उद्देशाने लिहिलेल्या आहेत".
               पुस्तकात एकूण १२   कथा आहेत व त्या सगळ्या सुरस आहेतच व आपल्याला बरीच नवीन वैज्ञानिक माहिती देतात जी रोज ऐकुन पण आपण दुर्लक्षित करतो अशीही . अनेक कथांमधून आपल्याला नवनवीन माहिती मिळत जाते. पुस्तक नक्कीच वाचनीय आहे. हातात  घेतल्यावर खाली ठेवावे असे वाटत नाही .
मुखपृष्ठावर क्लीक करून आजच आपली प्रत विकत घ्या.




best marathi autobiography 

७ झोंबी - आनंद यादव 




झोंबी म्हणजे लेखक आनंद यादव यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग.बालपण व सुरुवातीच्या शिक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आयुष्याशी केलेली ,झोंबा झोंबी म्हणजे हे पुस्तक.त्यांचे एकूण आत्मचरित्र ४ भागांमध्ये आहे.पुढील पुस्तके नांगरणी,घरभिंती आणि काचवेल ही होत.
     पुस्तकाला पु लं ची१६ पानांची प्रस्तावना लाभली आहे.त्यांनी लिहिलेली ही प्रस्तावना वाचली की ह्या पुस्तकाला अजून कुठल्याही समीक्षानाची,अभिप्रायची गरज नाही असे वाटते.अतिशय उत्तम भाषेत पुस्तकाचा लेखाजोखा त्या १६ पानाच्या अर्कात आहे.
    प्रचंड पराकोटीची गरिबी,अशिक्षितपणा,शिक्षणाविषयी पालकांची उदासीनता,पोटापाण्यासाठी करावे लागणारे काबाड कष्ट,जेवायलाही मिळेल ना मिळेल ही परिस्तिथी  हया सर्वातून लढत झगडत कुठलाही पाठिंबा नसताना,आजूबाजूला फक्त नकारात्मकता दिसत असताना लेखक केवळ शिक्षणाच्या उर्मीने व इच्छेने जगत जातो व काबाड कष्ट करून अतंर्गत बुद्धिमत्ता व कष्ट ह्या जोरावर शिक्षण कसे पुरे करतो हे वाचनीय झाले आहे.
   ही कादंबरी मराठी साहित्यातील अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर आलेली,वाचकांचा ग्रामीण जीवनाविषयीचा दृष्टिकोनच बदलून टाकणारी ठरली.सर्वच स्तरावरून तिचं कौतुक झालं.महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार व भारत सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कारवा इतर अनेक पुरस्कार ह्या पुस्तकाला मिळालेत.
     पराकोटीच्या प्रतिकूल परिस्थितीमध्येही केवळ जिद्द आणि चिकटीच्या जोरावर आपले ध्येय साध्य करता येते हीच शिकवण ह्या कादंबरीतून मिळते.कादंबरीतील पराकोटीच्या गरिबीचे व इतर प्रसंगाचे वर्णन कित्येकदा अंगावर येते.उत्कृष्ट म्हणून नावाजलेली ही कादंबरी नक्की .

तुमची प्रत आजच खरेदी करा




८ स्वामी - रणजीत देसाई 


 
 रणजित देसाई : मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. १९४६ साली 'भैरव' या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक. १९५२मध्ये 'रुपमहाल' हा पहिला कथासंग्रह प्रकाशित. त्यानंतर सातत्याने कथालेखन. ग्रामीण जीवनावरील व ऐतिहासिक व्यक्तिरेखांवरील लेखन अधिक रसरशीत. 'स्वामी'ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त.
मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली रणजित देसाई यांची कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन,कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक करुणगंभीर जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे. इतिहास आणि साहित्य ह्याचे एवढे उर्जस्वल नि रोमहर्षक रसायन मराठी भाषेत आजतागायत कोणी निर्माण करू शकलेले नाही.
कादंबरीतील अतिशय उठावदार आणि कलात्मक व्यक्तिरेखा आहेत,माधवराव, रमाबाई आणि राघोबादादा यांच्या. सद्गुणी आणि तेजस्वी कर्तव्यदक्ष माधवराव,स्वार्थी,भोळसट,राजद्रोही राघोबा आणि सोशिक, त्यागी, साध्वी रमाबाई या तिन्ही चरित्ररेखा वाचकांच्या मनांवर विलक्षण परिणाम करतात. थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते. उदात्ततेने भारावून जाते आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठही होते. स्वामी वाचून वाचक दिपून जातो. दिग्मूढ होतो.
इतिहास आणि ललितकृती या दृष्टींनी रसोत्कट असलेली शोकात्मिक कादंबरी  

तुमची प्रत आजच खरेदी करा







९ शितू - गोपाल नीलकंठ दांडेकर




  गोनीदांच्या ह्या कादंबरीबद्दल बरंच ऐकून होतो.शितू ही त्यांची मानसकण्या असं ते म्हणत.गोनिदाना भरपूर प्रसिद्धी व प्रेम मिळवून दिलेली ही कादंबरी.
       कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात घडणारी ही कथा तसं म्हणायला गेलं तर ना व्यक्तिचित्रण आहे ना प्रेमकहाणी .प्रथम आवृत्ती १९५३ सालची आहे.त्या वेळच्या रूढी, परंपरा,राहणी,जीवनमान यांचं चित्रण कादंबरीत येतं. अजाणत्या वयात बालविधवा झालेली,पांढऱ्या पायांची,घोखाई,हडळ म्हणून हेटाळली गेलेली,बापाचा निवारा लवकर गेलेली एक लहान निर्वाज्य पोर ते अप्पांच्या पंखाखाली मोठी झालेली समजूतदार,सोशिक,सुंदर शितू हा प्रवास लेखकांनी मस्त मांडलाय.कोकणातील बारीकसारीक वर्णनं आपल्याला थेट तिथे घेऊन जातात.
       शितू व अप्पांच्या मुलगा विसू यांचं भावविश्व अव्यक्त प्रेमभावना,समाज चालीरीतीमुळे आलेली बंधनं, शीतूची असहायता व घुसमट व त्यांचा शेवट गोनिदानी मस्त रेखाटलाय.वाचकांना शितू आपलीच वाटायला लागते.एक उदासीनपणा,पोकळी भरून राहते मनात.
      रावीमुकुलांचं मुखपृष्ठ खासच.दीनानाथ दलालांची पुस्तकामधली रेखाटन लाजवाब.गोनीदांच्या वाचकांनी गोनीदांच्या हृदयाच्या जवळ असलेलं हे प्रेमकाव्य एकदा जरूर वाचावं.आताच्या काळात जुने संदर्भ,चालीरीती आपल्याला पचनी पडायला कठीण जातील कदाचित पण शितू मनात घर करून राहिली नाही असं म्हणणारा विरळाच....
मुखपृष्ठावर क्लीक करून आजच आपली प्रत विकत घ्या.



तुमची प्रत आजच खरेदी करा

.






best Marathi book to read before you die


१० छावा - शिवाजी सावंत 




शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्यानं पण पुरेपूर उमजलं आहे. 'छावा'च्या जोरदार स्वागतानं तर हे सिद्ध झालं आहे.
एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंदर! मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वासघातक्यांची!
रणांगणाचा सत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलुखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येतांना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि 'बुधभूषणम' काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा हे पाहिले की प्रतिभा देवदत्त असली तरी एक अजब व विस्मयकारी देणगी आहे असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्यायले की मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते, हे छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी!


तुमची प्रत आजच खरेदी करा

 



११ चक्र-जयवंत दळवी



 जयवंत दळवींची हि पहिलीच कादंबरी पण एक लेखक म्हणून ते किती भन्नाट लिहू शकतात ह्याची पुरेपूर साक्ष देणारी .
       कादंबरीची पश्वभूमी म्हणजे मुंबईतील एक झोपडपट्टी. पुस्तक सत्तर च्या दशकांत पूर्वार्धाला लिहिल गेलं  असल तरी अजूनही ते तितकंच वाचनीय आहे . झोपडपट्टीतील गरीब कुटुंब,त्यांची भाषा ,विचारसरणी,जगण्यासाठी करावा लागणारा आटापिटा ,बकाल पणाचे वास्तविक दर्शन अंगावर काटा आणते. आपल्यासारखा मध्यमवर्गीय पांढरपेशा माणूस अक्षरशः व्यतिथ होतो. कादंबरीत बकाल झोपडपट्टीत राहणाऱ्या बेन्वा ,त्याची आई,त्याचे मित्र ,तिथला तडीपार झालेला गुंड लुका ह्याच्या बरोबर कादंबरी पुढे जात राहते. त्याचे जीवनमान,आत्यंतिक गरिबीमुळे आलेलं अगतिक जीवन,एक वेळच्या भाकरीची भ्रांत असलेल्या रिकामटेकड्या माणसांची जगण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड त्यांनी झोपडपट्टी वासियांच्याच भाषेत समर्थपणे उभी केली आहे .
           पराकोटीच्या गरिबीमुळे माणूस कुठल्या थराला जाऊन वागतो,त्यामुळे त्याच्या सुंदर स्वप्नांची धूळधाण  कशी होते व  नियतीचे हे दुष्ट चक्र कसे चालू राहते हेच पुस्तकात अक्षरश जिवंत केलय व पुस्तकाचं नाव सार्थ केलय. पुस्तकात शिवराळ भाषा शिवराळ न वाटता वास्तववादाकडे झुकते त्यामुळे ते आक्षेपार्ह नाही वाटत .एकुन एकदा वाचण्यासाठीपुस्तक छान आहे 



तुमची प्रत आजच खरेदी करा
 ..




१२ पानिपत- विश्वास पाटील 


'पानिपत' ही कादंबरी केवळ आणखी एक ऐतिहासिक कादंबरी कादंबरी नाही. ती वेगळ्या प्रकृतीची ऐतिहासिक कादंबरी आहे. तिला प्राणभूत असलेली जाणीवही गंभीर आधुनिक मनाची जाणीव आहे. बहुसंख्य ऐतिहासिक कादंबर्‍या या गतकालचा गौरव करणार्‍या आणि ऐतिहासिक मनोवृत्तीचा अंगिकार करणार्‍या असतात. भूतकालात वर्तमान शोधणार्‍या अगर भूत, वर्तमान, भविष्य यांच्यातील अनुसंधान पाहणार्‍या नसतात. हे घडण्यासाठी ऐतिहासिक घटनांचा अन्वयार्थ तपासणारे भान सतत जागे असावे लागते. श्री. विश्वास पाटील हे भान बाळगतात. त्यामुळे 'पानिपत'मध्ये एकमेकात गुंतलेली ऐतिहासिक घटनांची मालिका, उन्हापावसात, थंडीवार्‍यात शेकडो कोस मोहिमेवर निघालेले लढाऊ दल आणि लवाजमे, राजकारणातले डावपेच, खलबते, स्वार्थलोभ, वासनाविकार, ऐतिहासिक व्यक्तींची खाजगी, सार्वजनिक स्वप्ने, रोमहर्षक घटना आणि दैवगतीचे उलटेसुलटे पलटे, किल्ले, तटबंद्या, नद्यानाले, पिकांनी श्रीमंत झालेली भूमी यांची
ठसठशीत वर्णने तर आहेतच पण त्याबरोबर विशिष्ट समाजाचे, वंशाचे आणि जातीजमातीचे उपजत स्वभावविशेष आणि गुणदोष यांची थक्क करणारी जाण आहे. ही जाण या कादंबरीच्या गुणवत्तेचे मर्म आहे. त्यामुळेच ही ऐतिहासिक कादंबरी म्हणजे राष्ट्रधर्म ओळखणार्‍या एका आधुनिक मनाने घेतलेला एक गतकाळचा शोध असे जाणवते.

पानिपतने केवळ लोकप्रियतेचा इतिहास निर्माण केलेला नाही. यावर्षीचे 'प्रियदर्शिनी' पारितोषिक या कादंबरीला मिळाले ही रसिक मान्यतेची आणि चिकित्सक पसंतीची निशाणी आहे. कादंबरीच्या बहुमुखी गुणवत्तेचा तो उचित गौरव आहे. श्री. विश्वास पाटील यांच्या भावी साहित्यकृतींच्या गुणवत्तेला केलेले ते एक आवाहन ही आहे. त्यांच्या लेखणीचा श्वास मोठा असल्याने या आवाहनाला ते योग्य प्रतिसाद देतील असा भरंवसा वाटतो.



तुमची प्रत आजच खरेदी करा







१३ राधेय- रणजित देसाई



राधेच्या माध्यमातून वाचकांना कर्ण आणि त्या परिस्थितीबद्दल जाणून घेता येईल ज्यामुळे त्याला  महाभारतात एक संस्मरणीय स्थान मिळालं. सुरुवातीपासूनच कर्ण कौटुंबिक प्रेमापासून वंचित होता. आयुष्यभर त्याने इतरांकडून त्रास सहन केला. त्याला त्याची स्वत: ची आई कुंतीने जन्मापासून त्याग केला  आणि बर्‍याच लोकांनी त्याची थट्टा केली कारण त्याचा जन्म निम्न वर्गात झाला होता. कर्नाची पायाभूत वर्षे खूप गोंधळलेली होती, त्यामुळे त्यांची प्रचंड शक्ती झाकोळून गेली 

तथापि, राधेय माध्यमातून वाचक कर्णच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचे आणि त्याला निर्भय योद्धा कसे पदार्पण केले याची कल्पना येऊ शकते. ही कादंबरी मूलतः नायक कर्णला दिलेली श्रद्धांजली आहे ज्याने आपल्या मित्राशी एकनिष्ठ राहून आपल्याच कुटुंबातील सदस्यांविरूद्ध लढा दिला. 



तुमची प्रत आजच खरेदी करा




best Marathi historical book

१४ ययाती-वि स खांडेकर 




भारतीय ज्ञानपीठाचा "वाग्देवी" पुरस्कार १९७४ साली मिळालेली खांडेकराची अतिउत्कृष्ट कादंबरी.
साहित्य अकादमी पुरस्कार १९६०
महाराष्ट्र राज्य पुरस्कार १९६०
कै. विष्णु सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतींच्या रत्नमाळेतील 'ययाति'चे स्थान मेरुमण्यासारखे आहे.
या कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापुरता संबंध नाही. एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरीत स्वतंत्र रीतीने गुंफले आहेत. आपल्या प्रतिभेची जात, तिची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्माविष्काराला योग्य अशीच कथा निवडली. ती ज्या माध्यमातून त्यांना प्रगट व्हावीशी वाटली, त्याच्यावर त्यांचे प्रभुत्व होतेच. पुराणकथांत जे भव्य-भीषण संघर्ष आढळतात, त्यांचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती. जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगुर आहे, तसेच ते दुसर्‍या दृष्टीने चिरंतन आहे; ते जितके भौतिक आहे, तितकेच आत्मिक आहे, या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते. त्यामुळेच एका पौराणिक कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम ललितकृती कशी निर्माण करता येते, याचा आदर्श वस्तुपाठच 'ययाति'च्या रूपाने श्री. खांडेकरांनी वाचकांपुढे ठेवला आहे.
कामुक, लंपट, सप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही, असा ययाति; अहंकारी, महत्त्वाकांक्षी; मनात दंश धरणारी आणि प्रेमभंगाने अंतरंगात द्विधा झालेली देवयानी; स्वत:च्या सुखाच्यापलीकडे सहज पाहणारी आणि ययातिवर शरीरसुखाच्या, वासनातृप्तीच्या पलीकडच्या प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आणि निरपेक्ष प्रेम हाच ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे, असा विचारी, संयमी व ध्येयवादी कच या चार प्रमुख पात्रांमधील परस्परप्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत.
'ही कादंबरी ययातीची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी,' अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.

तुमची प्रत आजच खरेदी करा
.



१५ श्यामची आई- साने गुरुजी


श्यामची आई हे अनेक दशकांनंतरही आणि मराठी साहित्यात एक उत्कृष्ट पुस्तक मानले जाते. श्यामची आई' हे स्व. सानेगुरुजींचं मराठीतील सर्वांगसुंदर पुस्तक. इतक्या वर्षांत कित्येक पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचं काम या एका पुस्तकाने केलं. अजूनही लहानपणी या पुस्तकाची पारायणे केलेले पालक आपल्या मुलांनीही हे पुस्तक वाचावं म्हणून धडपडतात.

एखाद्या आईच्या प्रेमाचे मोठेपणा आणि तिचे नैतिक पालन-पोषण तिच्या मुलांचे - विशेषत: श्याम, जे स्वत: किशोरवयीन साने गुरुजी स्वत: किशोरवयीन आहेत - सूक्ष्म मानवांमध्ये कसे चित्रित करतात यामध्ये हे सुंदरपणे रेखाटले आहे. वृद्ध श्यामने आश्रमातील आपल्या मित्रांना सांगितलेल्या या मातृ आठवणींचा हा पुस्तक आहे. प्रत्येक गोष्ट आईने शिकवलेल्या अद्भुत जीवनाचे धडे देते. तसेच, लेखकाचे लेखन उत्कृष्ट आणि अस्खलित आहे.  आत्मा समृद्ध करण्याच्या अनुभवासाठी मी याची शिफारस करतो.



तुमची प्रत आजच खरेदी करा



best marathi book on shivaji maharaj

 १६ राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे



बाबासाहेब पुरंदरे लिखित छत्रपती शिवाजी महाराजांवरील हे सर्वात लोकप्रिय वाचलेले आणि विकले जाणारे उत्तम पुस्तक आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीच्या ऐतिहासिक स्वरूपाच्या लढाईच्या मृत्यूपर्यत ऐतिहासिक तपशिलांचे हे पुस्तक उत्कृष्ट वर्णन आहे.

असंख्य ऐतिहासिक कागदपत्रांच्या संदर्भात पुस्तक संकलित केले आहे आणि सर्वांसाठी सोप्या भाषेत आहे. शिवाजी महाराजांवर अनेक पुस्तके, व्याख्याने, नाटकं, चित्रपट, प्रदर्शनं, स्लाइड शो लिहून ठेवणारे लेखक. लोकांना शिवाजी महाराजांची महानता कळविण्याच्या उद्देशाने लेखकाने शिवाजी महाराजांचे हे पात्र रेखाटन लिहिले आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पार्श्वभूमीबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली जी कुठल्याही मार्गाच्या कथेबाहेर सिद्ध होत नाही. सर्व तपशील ऐतिहासिक कागदपत्रांच्या अभ्यासाच्या आधारे दिले आहेत आणि जे वाचल्यानंतर कळू शकतात.

प्रत्येक किल्ल्यातील लढायाची घटना, शिवाजी महाराजांनी केलेले विविध हल्ले इत्यादी तारखांसह दिले आहेत जे वाचताना प्रत्येक पानाचे थेट चित्र तयार करतात. या पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांबद्दलची सर्व माहिती मिळते आणि ती आपल्या लायब्ररीत भर घालण्याजोगी आहे.

हे पुस्तक सध्या सुमारे १००० पृष्ठांचे आहे.


तुमची प्रत आजच खरेदी करा
 



१७ महानायक - विश्वास पाटील 



नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जीवनकहाणी!
अडतीस कोटी देशबांधवांची गुलामगिरीतून मुक्तता; याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या, लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी!
जीवनभरचा धगधगता संघर्ष, जिवलग स्वकियांशी आणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकियांशीही. त्याला व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक लढाऊ राष्ट्र मानून, जपानसारख्या हिशेबी देशानेही अभूतपूर्व मदत केली.
'चलो दिल्ली'ची त्यांची गर्जना साकारण्यासाठी इंफाळ-कोहिमा- ब्रम्हदेशच्या अरण्यात जुंपला एक घना रणसंग्राम! नियतीच्या आडव्या-तिडव्या भेसूर नाचानेही ज्याची कवचकुंडले कधीही निस्तेज झाली नाहीत असा - महानायक!
देशोदेशींच्या दफ्तरखान्यात आजवर अडकून पडलेल्या दुर्मिळ दस्त-ऐवजांचा, नव्या संशिधित कागदपत्रांचा वेध घेऊन व त्या 'रणवाटं'वरून भ्रमण करून चितारलेली नेताजींची अपरिचित जीवनकहाणी.


तुमची प्रत आजच खरेदी करा



best marathi funny book

१८ व्यक्ती आणि वल्ली- पु ल देशपांडे 



व्याक्ति अणी व्यल्ली हा लोकप्रिय मराठी लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचा चरित्र रेखाटनांचा संग्रह आहे. वास्तविक जीवनातील पात्र आणि घटनांकडून रेखाटणे, ही रेखाटना लोक जितकी भिन्न आणि मनोरंजक असू शकतात तितकीच भिन्न आहेत.

व्यक्ती अनी व्यल्ली मधील कथा २० वर्षांहून अधिक कालावधीत लिहिल्या गेलेल्या आहेत. पुस्तकातील २० कथांपैकी भैय्या नागपूरकरांविषयीची कथा लेखकाने लिहिलेली सर्वात आधीची कथा होती.जीवनातल्या विसंगत अनुभवांना विनोदी शैलीनं गहिरेपणा प्राप्त करून देणार्‍या पुलंच्या समर्थ लेखणीतून उतरलेला हा व्यक्तिचित्रांचा संग्रह. ह्या पुस्तकातल्या व्यक्ती आणि वल्लीही मनाला भावतात. मिस्कील शैली आणि निर्मळ विनोदाच्या पखरणीमुळं मनाची मरगळ दूर होऊन प्रसन्नतेचा शिडकावा मनावर होतो. पुलंच्या प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार ह्या पुस्तकात पाहायला मिळतो.


या पुस्तकात बरीच वेगळी स्केचेस आहेत. नारायण विवाहसोहळा आयोजित करण्यात मदत करतात आणि कार्ये सुरळीत पार पडतात याचीही खातरजमा करतात. नारायणची एक रोचक बाजू लेखक प्रकट करतात.

सखाराम गट्टणे नावाचा एक शालेय मुलगा देखील आहे जो शास्त्रीय मराठी बोलतो आणि पुस्तकांचा व्यसनाधीन आहे. लखू रिसबूड, जो आणखी एक मनोरंजक व्यक्तिरेखा आहे, तो एक निराश लेखक आहे जो आपल्या पेनने जग बदलू इच्छित होता, परंतु काही अस्पष्ट मासिकात उपसंपादक म्हणून काम करतो.


तुमची प्रत आजच खरेदी करा



१९ तुंबाडचे खोत - श्री ना पेंडसे 



मराठी भाषेतील श्रेष्ठ कादंबरीकार ही श्री. ना. पंडसे यांची आजची पदवी आहे. रसिकांची व श्री. पेंडसे यांचीही आजवर समजूत अशी होती की 'रथचक्र' ही त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी. 'एल्गार'पासून सुरू झालेल्या त्यांच्या कादंबरीयात्रेचा अखेरचा मुक्काम म्हणजे 'रथचक्र'! आणि असे वाटत होते की त्यानंतर स्वभावधर्मानुसार ते कादंबरीलिखाण करतच रहातील पण 'रथचक्र' नंतर काही भव्यतर आलोक असेल, अशी त्यांना व रसिकांना बहुतकरून कल्पनाही नसणार.

- पण मराठी कादंबरीचे भाग्य असे की 'रथचक्र' नंतर आता आणखी एक महाकाय अशी लोकविलक्षण कादंबरी पेंडसे यांनी लिहिली आहे, 'तुंबाडचे खोत'. मुळात या दुखंडी कादंबरीचा आवाकाच प्रचंड आहे. तुंबाडच्या खोत घराण्याच्या ज्ञात इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटिश अमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच अमदानीतच्या अंतिम दशकात, स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रसंगी. म्हणजे जवळपास सव्वशे वर्षांचा हा प्रदीर्घ कालखंड आहे. तुंबाडकर खोतांच्या आद्य पूर्वजांपासूम विद्यमान वंशजांपर्यंत या इतिहासाची व्याप्ती आहे. या चित्रविचित्र इतिहासाच्या मार्गक्रमणात पदोपदी असंख्य स्वभावविशेष अशा व्यक्ती आणि त्या व्यक्तींच्या स्वाभाविक संघर्षातून निष्पन्न होणार्‍या अनिक घटना भेटत रहातात. त्यात पुन्हा एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीसारखी नाही. एक घटना दुसरीसारखी नाही. एकूणएक सर्वच व्यक्ती व घटना स्वत्वविषेष अशा. आणि काळ सव्वाशे वर्षे असला तरी स्थळ मात्र एकच: तुंबाड आणि तुंबाडचा परिसर. तुंबाडच्या खोतांच्या कुलवृतांताची ही बखर ही एखाद्या रम्याद्भुत आणि उग्रभीषण कहाणी आहे
.


तुमची प्रत आजच खरेदी करा





best Marathi comedy book 

२० बटाट्याची चाळ - पु ल देशपांडे 



 

बटाट्याची चाळ (चाल किंवा सोसायटी) मध्ये राहणारे पात्र आणि त्यांची कार्यपद्धती इतकी यथार्थपणे सांगितली गेली आहे की आपण वाचता तसेच त्यांना पाहू आणि ऐकू शकता. पु.ल.ने नियमितपणे जीवनातील निरनिराळ्या विषयांना त्याच्या निरीक्षणावरून आणि स्वतःच्या अनुभवावरून स्वतःच्या अनुभवांमधून विनोद आणि व्यंगचित्र यांच्यात समतोल साधला आहे. बटाट्याची चाळ अजून उभीच आहे. ऊन खात, पाऊस पचवीत, समोरच्या नवीननवीन इमारतींना तोंड देत उभी आहे. खिडक्यांचे आणि कठड्यांचे लाकडी गज अर्ध्यांहून अधिक उडालेले आहेत. जिने आपली पायरीसोडून वागायला लागले आहेत. भल्याभल्यांचे पाय येथे घसरू लागले आहेत. भिंतींचे पोपडे उडाले आहेत. रंग तर कित्येक वर्षांपूर्वीच उडाला. खूप वर्षं झाली त्याला. आज जो रंग भिंतींना दिसतो ती छटा कुठल्या डब्यातून येणार्‍या रंगाची नाही. हा अनेक वर्षं अनेकांनी पुसलेल्या बोटांतून, टेकलेल्या डोक्यांतून, धुरांतून तयार झालेला रंग आहे. त्या बटाट्याच्या चाळीच्या या गमतीजमती!


तुमची प्रत आजच खरेदी करा


२१ संभाजी- विश्वास पाटील



छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा आपल्या तलवारीच्या बळावर संभाजी महाराजांनी विस्तार केला. स्वराज्यातला एकही किल्ला गमावला नाही की आरमारातले एकही जहाज बुडू दिले नाही. पण त्याच वेळी कावेरीच्या महापात्रात घोडी घातली. कर्नाटकातील राज्य दुप्पट केले. त्रिचनापल्लीच्या पाषाणकोटाला सुरुंग लावले. जंजिर्‍याच्या सिद्दीला जेरीस आणले. पोर्तुगीज व्हॉइसरॉयला होडक्यात बसून पळायला लावले. त्यांचे तीन चतुर्थांश राज्य स्वराज्याला जोडले. व्यापारासाठी आलेल्या इंग्रजांच्या वखारींची लांबी-रुंदी किती असावी, याचे निर्बंध प्रथम संभाजीराजांनी घातले. वसीपासून पणजीपर्यंत किनारपट्टीवर जरब बसवली. मुख्य म्हणजे पाच लाख सैन्यासह तळ ठोकून असलेल्या औरंगजेबाशी आठ वर्षांहून अधिक काळ अनेक आघाडयांवर त्यांनी लढा दिला. छत्रपती संभाजीराजांचे योद्धेपण अशा अनेक मोहिमांमधून सिद्ध झाले आहे. ही वीरगाथा विश्वास पाटील यांनी 'संभाजी' या कादंबरीतून गाईली आहे.

ज्याच्याकडे शिक्षा करण्याचे अधिकार असतात, त्याच्याकडे क्षमा करण्याएवढे उदार अंत:करण असावे लागते. संभाजीराजांपाशी अशी उदारता निश्चित होती. संभाजीराजे छत्रपती झाल्यानंतर हिर्‍यांनी भरलेले दोन पेटारे चोरताना हिरोजीबाबा फर्जंद पकडले गेले. शिवाजीमहाराजांनी आग्य्राहून सुटका करून घेताना हिरोजीबाबांचे साह्य घेतले होते. महाराजांच्या जागी हिरोजीबाबाच आजारी असल्याचे सोंग करून पडलेले होते. हे जाणून संभाजीराजे हिरोजीबाबांना म्हणाले, ''फर्जंदकाका, नुसती इच्छा प्रदर्शित केली असती तरी आपल्या पायावर अख्खा खजिना रिता केला असता! असे चोरचिलटांचे मार्ग कशासाठी अवलंबिलेत?'' त्यांना या गुन्ह्याबद्दल संभाजीराजांनी उदार अंत:करणाने माफ केले.

अष्टप्रधानांनाही त्यांनी एकदा माफ केलेले दिसते. स्वराज्याच्या उभारणीत छत्रपती शिवरायांबरोबर अष्टप्रधानांनी कष्ट झेलले होते, पण नंतरच्या काळात थोडी स्थिरता आल्यावर त्यांचा स्वार्थ जागा झाला. साहजिकच संभाजीराजांचा स्पष्टवक्तेपणा त्यांना रुचत नव्हता. अष्टप्रधानांचा इंग्रजी व्यापार्‍यांकडून बक्षिसी मिळवण्याचा प्रयत्न युवराज संभाजी यशस्वी होऊ देत नसत. त्यामुळेच संभाजीराजांना छत्रपती होण्यापासून दूर ठेवण्याचा कट त्यांनी रचला होता. सेनापती हंबीरराव मोहिते यांनी आपल्या सख्ख्या भाच्याला- राजाराम राजांना- छत्रपती करण्याएएवजी संभाजीराजांना छत्रपती करण्याचा कौल दिला आणि कट उधळला. अष्टप्रधानांनी औरंगजेबाला निष्ठा वाहिली होती. पण संभाजीराजांनी एकदा त्यांना माफ केले. कारभार्‍यांनी पुन्हा गद्दारी केल्यानंतर त्यांना हत्तीच्या पायी दिले. एकाच वेळी मृदू व कठोर अशी दोन रूपे संभाजीराजांमध्ये वसत होती, याची अनेक उदाहरणे समोर येतात.

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शंभर-सव्वाशे वर्षांनी लिहिलेल्या बखरींमध्ये त्यांच्याविषयी एकांगी व विपर्यस्त चित्रण केलेले आढळते; तसेच कनोजी कलुषाविषयीही चुकीचे लिहिलेले आढळते. कनोजच्या या ब्राह्मणाने संभाजीराजांना काव्यशास्त्रनपुण केले होते. रणांगणात तलवार गाजविली होती. रायगडावर आक्रमण करून आलेल्या औरंगजेबाच्या सैन्याला पळताभुई थोडी केली होती. कलुषाला मोगलांनी हालहाल करून मारले. तापलेली सळी डोळ्यात खुपसली गेल्यानंतरही हा कवी हिमतीने काव्यगायन करीत होता. म्हणून त्याची जीभ कापण्यात आली. या लढवय्याचे मर्मग्राही चित्रण या कादंबरीत येते.

येसूबाईच्या हाती राज्यकारभार सोपविणारा आणि स्वत: रणांगण गाजवणारा वीर संभाजीराजा येथे भेटतो. दुष्काळात दोन वर्षे किल्ल्यांवर व रयतेला पुरेशी रसद पुरविणारा जाणता राजा येथे दिसतो. नद्यांवर धरणे बांधणारा राजा समोर येतो. मित्रासाठी लढणारा कलुषा भेटतो. स्वराज्यावर प्रेम करणारी गोदू मनाला चटका लावून जाते. 'संभाजी' ही कादंबरी म्हणजे एका शूराचा पोवाडाच आहे.



मुखपृष्ठावर क्लीक करून आजच आपली प्रत विकत घ्या.

  



२२ कोसला - भालचंद्र नेमाडे 


कोसला ही कादंबरी पारंपारिक कादंबरीच्या रचनेचे संकेत मोडून, यशस्वी तंत्र झुगारून अनपेक्षित, काहीशा विस्कळीत, तर्‍हेवाईक शैलीत लिहिलेली ही कादंबरी आशय आणि आविष्कार या दोन्ही बाबतींत वेगळी आहे. खानदेशातल्या एका खेड्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेला पांडुरंग सांगवीकर हा १९६० च्या पिढीच्या तरुणांचा प्रतिनिधी कादंबरीचा नायक आहे. लग्न, पितापुत्रसंबंध, शिक्षण, राजकारण, अध्यात्म अशा अनेक विषयांचा विचार तो पूर्वसंकेत टाळून करतो. शिकत असताना समवयस्कांचा खोटेपणा, भ्याडपणा, वसतिगृहातील मुलांचे टोळीवजा व्यवहार, दांभिक उथळ प्राध्यापक, लेखक, पुढारी वक्ते यांचा भंपकपणा या सार्‍यांचा अनुभव घेत असता हळूहळू तो समाजापासून तुटत जातो. कधी गंभीरपणे, कधी उद्वेगाने, चिडून किंवा उपरोधाने, कधी तुच्छतेने तो जगण्यातील विसंवाद आणि विसंगती मांडत जातो. अर्थहीनतेची अनेक रूपे टिपत असताना तो भ्रमनिरास आणि विफलता अनुभवतो.
भाषेचा कमालीचा अर्थगर्भ वापर करणारी ही कादंबरी आजही तिच्या वेगळेपणाने उठून दिसते ...
"आपण सगळं करू, हे म्हणतात वगैरे ते सगळं. थेट इतकी वर्षं अशी उदाहरणार्थ काढलीच की नाही? आणि आणखीही थेट वर्षं काढायची घमेंड वगैरे आहे. आपण कुणा दुसर्‍याची वगैरे वर्षं चोरणार नाही. किंवा कुणाच्या बापाचा पैसा वाया घालवणार नाही. वय गेलं असं हे अवांतर म्हणतात. ते मात्र उदाहरणार्थ बरोबर नाही. आणखी पुढे नाना वर्षं आहेतच. वर्षं नीट असतातच. आपण उदाहरणार्थ किती का उशिरा उठतना? त्या मानानं कसं का वागतना? आपापली वर्षं पुढे अचूक शिल्लक असतातच. ती वगैरे काही कमावता येत नाहीत. तेव्हा गमावली ही भाषा मात्र उदाहरणार्थ इतकी बरोबर नाही. किंवा वर्षं अत्यंत वाया गेली, असं म्हणणं उदाहरणार्थ चूक आहे. म्हणजे बरोबरच."


तुमची प्रत आजच खरेदी करा






२३ पावनखिंड- रणजीत  देसाई 


 

अफझल खानाला प्रतापगडाजवळ मारल्यावर आदिलशहाने पाठवलेल्या सिद्धी मसूद ने जेंव्हा पन्हाळा गडाला वेढा दिला. तो सोडवण्यासाठी शिवाजी महाराजंसारखा हुबेहुब दिसणारा वीर शिवा काशिद स्वतःहून सिद्धीच्या जाळ्यात अडकला.
दुसरीकडे बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे बंधू फुलाजी आणि 600 सैनिक यांसमवेत महाराजानी विशालगडाकड (पूर्वीचा खिळगील) आगेकूच केली. 600 मावळे पाठीमागे सिद्धीचे 10000 सैनिक आणि पुढे विशालडाच्या पायथ्याशी असलेले 1000-2000 मुघल सैनिक.
मध्येच बाजी आणि फुलाजी आणि 300 सैनिक यानी घोड खिंडीत थांबून येणार्‍या सैनिकाना अडवण्याचा निर्धार केला आणि महाराज पुढे जाउन खिळगील गड चडले आणि तीन तोफा दिल्या. तो गड त्यावेळी काही केला चडवत नव्हता म्हणून त्यास विशालगड असे नाव दिले.
इकडे बाजी आणि फुलाजी यांनी तोफेचा आवाज ऐकताच हसत हसत आपला प्राण सोडला.
ती खिंड बाजींच्या रक्तानी पावन झाली होऊन पावनखिंड झाली...!!



तुमची प्रत आजच खरेदी करा




best Marathi book to read 

२४ वपुर्झा- व पू काळे 




कोणतंही पान उघडा आणि वाचा!
'वपुर्झा' हे पुस्तक कोणासाठी? ज्यांना मोत्याची चमक बघायची आहे अशा वेड्यांसाठी!
हे पुस्तक कसं वाचायचं? एका बैठकीत? अथ ते इति? एका दमात? छे! मुळीच नाही. काही हौशी घरांमध्ये ड्रेसिंग टेबलावर निरनिराळ्या अत्तराच्या बाटल्या असतात. जसा मूड असेल तसं अत्तर वापरायचं किंवा जसा मूड व्हावासा वाटत असेल तसं अत्तर निवडायचं. हे पुस्तक असंच वाचायचं. हवं ते पान आपआपल्या मूडनुसार उघडायचं आणि त्या सुगंधानं भारून जायचं.
एखादा सुगंध पुन्हा घ्यावासा वाटला तर? पुन्हा शोधायचा. ह्या शोधात आणखी काहीतरी सापडेल. म्हणूनच ह्या पुस्तकात अनुक्रमणिका, क्रमांक, संदर्भ काही दिलेलं नाही.
व. पु.काळे ह्यांचे हे पुस्तक कथा-कादंबरी वगैरे कोणत्याही प्रचलित साहित्यप्रकारात बदलता येणारे नसले तरी वपुस्पर्श झालेला हा वौविध्यपूर्ण लेखनगुच्छ असा आहे की वाचकांनी भरभरून दाद दिल्याने गेल्या बावीस वर्षांत त्यांचे सतरा वेळा पुन:पुन्हा मुद्रण करावे लागले आहे. एकाचा दुसर्‍याशी संबंध नसलेल्या तरीही त्यांच्यात एक धागा असलेल्या अनेक ढंगी परिच्छेदांची सुरेख गुंफण ह्या पुस्तकात गुंफण्यात आली आहे. त्यामुळेच आपल्या इच्छेनुसार हाताला लागेल ते पान उघडावे आणि त्या पानावरील लिखाणात मग ती एखादी छोटीशी गोष्ट असो वा मोजक्या शब्दात सांगितलेला तो एक विचार असो रंगून जावे असे हे पुस्तक आहे.
तुमची प्रत आजच खरेदी करा


must-read Marathi book to read before you die

२५ मृत्युंजय-शिवाजी सावंत 




अप्रतिम लेखनशैली. ज्या पद्धतीने सावंत यांनी सुर्यपुत्र दानवीर कर्णाच सर्वोत्तम वर्णन केले आहे.ते वाचतांनाआपल मन भावुक होऊन डोळे भरून आल्या शिवाय रहात नाही. कारण आयुष्यभर एकनिष्ठ राहुन नेहमीच दानवीर उपेक्षित राहिला.
कर्णाच्या दानशूरत्वाला तोड नाही हेच खरं! 'मृत्युंजय' एवढी अमाप लोकप्रियता कुठल्याही मराठी कादंबरीकाराच्या पहिल्याच कादंबरीला लाभलेली नाही

शिवाजी सावंतांचे छावा आणि युगंधर हे दोन्ही ग्रंथसुद्धा त्यांच्या अफाट लेखन कैशल्याची साक्ष देतात. मृत्युंजय शोकांतिका खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी!


 तुमची प्रत आजच खरेदी करा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या