"

Ticker

6/recent/ticker-posts

marathi kavita, marathi kavita on life, marathi kavita in pdf, marathi kavita aai var

marathi kavita, marathi kavita on life, marathi kavita in pdf, marathi kavita aai var


दोन मार्ग 



माझ्याकडे दोनच  मार्ग होते 

तिचा गुलाम व्हायचे किंवा 
तिच्याशी लढायचे,
मी  दूसरा मार्ग  निवडला 
अणि काय  आश्चर्य !!!
ती  माझी गुलाम झाली .

  •                                                             


कण वाळूचा 
मी एक कण धुळीचा 
नापीक रेताड खरखरीत वाळूचा 
तुकड्या तुकड्यानी तुटलेल्या अजश्र  कातळाचा

वाऱ्यापाण्यानी वाहिलेला 
चराचारानी तुडवून पिचलेला 
अलिप्त मी ऋणानुबंधाचे  धागे  सुटलेला

रणरणते पेटले रण 
तप्त  ज्वाळांनी होरपळले मन 
पेटलो कणाकणातून मी तरी नलगे  जीवनाची   तहान

मीच  मला जपले 
अंकुराचे स्वप्न कधीच ना पाहिले 
ना कोण्या झाडमूळानी मला  कवटाळले 

असाच  पडून राहीन 
कोण्या  घराची भिंत  होईन 
किंवा चुराडा होऊन उद्धस्त होईन

कधी सुटेल हा जाच
कधी कोसळलीच उरी वीज 
तर सोडून स्वत्व होईन पारदर्शक काच


स्थितप्रज्ञ 
ओली  रात्र 
ओली  पाहट 
कोरड्या मनात 
भेगाळली वाट 

चिंब  पाऊस 
बेफाम  ढग 
कोरडा घसा
तरी ना तगमग

हिरवा  शालू  
भरजरी  थाट 
नागवे शरीर 
कोरे लल्लाट 

बोचरा  वारा 
तुफानी  दर्या 
स्थितप्रज्ञ मी 
निर्विकार  चर्या 


marathi kavita, marathi kavita on life, marathi kavita in pdf, marathi kavita aai var


चांदणं चांदणं 

चांदणं चांदणं 
आभाळी गोंदण 
उगवला चंद्र 
पसरले नभांगण 

लक्ष दीप 
तेवीती तमात 
दिवाळी  साजरी 
रोजच नभात 

इवलासा  चंद्र 
महाप्रचंड तारे 
तरी दिसे मोठा 
बाकी ठिपके सारे 

शशी मिरवे 
रवीतेजाने  तोऱ्यात 
विखुरला मोतीहार 
पाऱ्याच्या  राज्यात 

मनीचे  दिसे 
ताऱ्यांच्या जंजाळात 
ठिपके जोडायचे 
विविध  कोनात





 माहेर 
नव्या सुखांची 
नवी चाहूल 
तरी मनात 
 आठवांचे काहूर 

काळजात माया 
आईबापांची 
तुटली सुखछाया 
मर्मबंधांची 

जोडते नवी
 नातीगोती 
नवे जीवन 
नवा सोबती 

नयनी अश्रूंची 
दाटीवाटी 
चालताना  पाय 
अडखळती 

घराचा अव्हेर 
नव्या घरासाठी 
उरेल माहेर 
क्षणिक विश्रांतीसाठी




 तीच हसणं 
हा हा हा हा
तिचं खळाळून हसणं
अगदी खोल अंतर्मनातून आलेलं  
हृदयाचा ठोका चुकवून साऱ्या सृष्टीत पसरललेलं
शरीराच्या रोमरोमांत भिनलेलं
मान तिरकी करून  डोळ्यात बघणं
लगेच बाजूला बघत हसतच राहणं  खूप खूप
हा हा हा हा हा

मात्र कधी कधी ती मंदस्मित करते
अगदी हळूच तोलून मापून चिकट वाण्याप्रमाणे
त्यात खूप अधूरेपणा  वाटतो
माझं काहीतरी हरवल्यासारखं बैचैन

मग मी  माझी कंबर कसतो
स्वतः विदूषक  होतो
टिवल्याबावल्या करत दोन चार उड्या मारतो
तिचा अंतरंगांचा वेध घेत
कसही  करून तिला हसवतो
मग ती हसते अगदी  तश्शीच
हा हा हा हा हा

माझं  समाधान होत
हरवलेलं  सगळं  क्षणात  परत  मिळतं
वाटतं  आयुष्य  जावं तिला हसवण्यात
ती हसतच राहावी मनापासून खूप खूप
माझ्यावर का होईना
अगदी हा हा हा हा हा 



मी गमावलंय


मी गमावलीय ती संध्याकाळ 
रात्रीच्या हातात हात घालून आलेली 
आपल्याला कुणी ना पाहिलेली 
फक्त  आपल्यातच  मग्न  झालेली 

मी गमावलाय तो संधिप्रकाशही 
आपल्या आकृत्या पुसट करणारा 
साऱ्या जगापासून आपणाला विलग करणारा 
तिमिरतेजाच्या  द्वंदात  अडकलेला 

अतीव दुःखानं  मला पछाडलय 
आणि तू झालीयेस स्वयंप्रकाशी तारा 
अशा वेळी  तो संधिप्रकाश 
तुझ्या तेजसमोर टिकेल काय ?

रोज संध्याकाळी मी थबकतो 
माझ्या भावना होतात विरळ 
तू दूर जाताणाची तुझी अस्पष्ट आकृती 
काळोखात अंगावर येत होत जाते नितळ 

marathi kavita, marathi kavita on life, marathi kavita in pdf, marathi kavita aai var

मिलन 
सख्या  तू सोबत  असताना
उठतात प्रचंड वादळे श्वासांची
ढगांच्याकडकडाटाने अंतरंगातून
माझं काळीज उंचबळून  येतं
धरा दुभंगणारा विजेचा लोळ
शरीरातून धावत  जातो
बेफाम  वेगाने वाहतात रुधिरनद्या
अतिवृष्टीने कोनाकोनांत धावणाऱ्या पाण्याच्या
कण कण शोधतात तुझे स्पर्श
जे आहेत शाश्वत चंद्रसूर्याप्रमाणे
धुंद नशिली कंपने उठतात
सागरलाटा अगणित प्रचंड
आणि माझे शब्द  जे तुझेच आहेत
विरतात आसक्त अधरात
फक्त तूच त्यांचा नाद ऐकू शकतो
त्यांना प्रवाही करू शकतो




हा संधिप्रकाशही  खुपतो माझ्या डोळ्यांना
मला हवीय ती काळी  रात्र
जी साऱ्या जगाला अंध करून
निपचित निजून जाईल
ताऱ्यांनी भारलेल्या आभाळाच्या
उल्का  गाळून  जाव्यात
सूर्याने ओरबाडून घ्यावे  चंद्राचे तेज
मग या मिट्ट  काळोखी  जगात
आपल्या मिलनाचं संगीत ऐकू  यावं
फक्त आपल्या दोघांना
                                                                   

marathi kavita on life

वादळानंतर 
जी लाट उसळली  होती साऱ्या जगाचा घोट घ्यायला 
तीच आता कातर होऊन पायाशी लोळत राहते मरगळलेल्या कुत्र्यासारखी 
गुंजनात तिच्या गाते  ती इतिहासाचे गोडवे 
सागराला देत राहते तिच्या शक्तीचे दाखले 
पण आता तो थकलाय... 
मागे सरतोयं... 
त्याला हवीय  विश्रांती 
पुन्हा खळबळून उठायला 
पुन्हा वाऱ्यावर स्वार व्हायला
आणि चंद्राच्या  ओढीने बेभान  व्हायला 
त्याने घेतलय धरतीच्या लेकरांना पोटात 
त्यांच्या इच्छा आकांशासह 
आणि ओकलाय  तो धरतीवर  स्वत्व 
सोडून आलाय  आप्तेष्टाना  तडफडत 
निर्भत्सना  करतोय त्या चंचल वाऱ्याची 
आणि त्या फसव्या चंद्राची 
जो रोज त्याच हृदय चोरून नेतो 
का रोखु  शकत नाही तो या आकर्षणाला 
जे ह्याला खोट्या आभाळच स्वप्न दाखवतंय 
तो चंद्रही अढळ आहे आणि  त्याची चांदणीही 
मग आपणच  एवढे अशांत  कसे ?
विचार करून थकलाय तो 
त्याला  हवीय विश्रांती...... 

















एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ