"

Ticker

6/recent/ticker-posts

आरती संग्रह-aarti ganpati,aarti sangrah,aarti of ganesh,aarti of ganpati,marathi aaratya,ganpatichi aarati,stotra


आरती संग्रह- aarti sangrah 



aarti ganpati,aarti sangrah,aarti of ganesh,aarti of ganpati,marathi aaratya,ganpatichi aarati,

गणपतीची आरती 


सुखकर्ता दु:खकर्ता वार्ता विघ्नाची | नुरवी पुरवी प्रेम कॄपा जयाची || 
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची | कंठी झळके माळमुक्ता फळांची || १ ||
जय देव जय देव जय मंगलमूर्ती | दर्शनमात्रे मन:कामनापूर्ती || धृ ||
रत्नखचीत फरा तुज गौरी कुमरा| चंदनाची उटि कुंकुमकेशरा||
 हिरेजडित मुगुट शोभतो बरा | रुणझुणती नुपूरे चरणीं घागरीया || २ ||
लंबोदर पितांबर फणिवरबंधना | सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ||
 दास रामाचा वाट पाहे सदना | संकटी पावावे निर्वाणीं रक्षावें सुरवरवंदना || ३ ||

शंकराची आरतीसंपादन करा

लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा | विषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ||
 लावण्यसुंदर मस्तकीं बाळा | तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळा || १ ||
जयदेव जयदेव जय श्री शंकरा | आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा || धृ ||
कर्पुगौर भोळा नयनीं विशाळा | अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा || 
विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा | ऎसा शंकर शोभे उअमवेल्हाळा || २ ||
देवीं दैत्यीं सागर मंथन पैं केले | त्यामाजी अवचित हलहल जे उठिले || 
तें त्वां असुरपणें प्राशन केलें | नीलकंठ नाम प्रसिद्ध झालें || ३ ||
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी | पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ||
 शतकोटींचे बीज वाचे उच्चारी | रघुकुळटिळक रामदासाअंतरी || ४ ||

देवीची आरतीसंपादन करा

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी | अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी | 
वारी वारी जन्ममरणातें वारी | हारी पडलों आता संकट नीवारीं || १ ||
जयदेवी जयदेवी महिषासुरमर्दिनी | सुरवर ईश्वरवरदे तारक संजीवनी || धृ ||
त्रिभुवनभुवनी पाहतां तुजऎसी नाही | चारी श्रमले परंतु न बोलावे काही |
 साही विवाद करितां पडले प्रवाहीं | ते तूं भक्तांलागी पावसी लवलाहीं || २ ||
प्रसन्नवदने प्रसन्न होती निजदासां | क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा |
 अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा | नरहरि तल्लिन झाला पदपंकज-लेशा || ३ ||

श्री विठ्ठलाची आरती संपादन करा

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगीं रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा । चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥
जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥ ध्रु० ॥
तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं । कांसे पीतांबर कस्तुरि लल्लाटीं ॥
 देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढें उभे रहाती ॥ जय० ॥ २ ॥
धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळें वनमाळा गळां ॥
 राई-रखुमाबाई राणीया सकळां । ओंवाळीती राजा विठोबा सांवळा ॥ जय० ॥ ३ ॥
ओंवाळूं आरत्या कुरवंड्या येती । चंद्रभागेमाजीं सोडुनियां देती ॥
 दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णाचा किती ॥ जय० ॥ ४ ॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्ये स्नानें जे करिती ॥ 
दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती । केशवासी नामदेव भावें ओंवाळीती ॥ जय० ॥ ५ ॥

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या