- प्रथम नवदुर्गा : माता शैलपुत्री
- द्वितीय नवदुर्गा : माता ब्रह्मचारिण
- तृतीय नवदुर्गा : माता चंद्रघंटा
- चतुर्थी नवदुर्गा : माता कूष्मांडा
- पंचम नवदुर्गा : माता स्कंदमाता
- षष्ठी नवदुर्गा : देवी कात्यायनी
- सप्तम नवदुर्गा : माता कालरात्रि
- अष्टम नवदुर्गा : माता महागौरी
- नवम नवदुर्गा: माता सिद्धिदात्री
ह्या नावदुर्गांची पूजा कशी करावी- कोणते मंत्र म्हणावेत आणि दुर्गेच्या या नऊ रूपांची महती काय आहे ते आपण जाणून घेऊ
शैलपुत्री
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गेच्या पहिल्या रूपाचं म्हणजे शैलपुत्रीचं पुजन केले जाते. हिमालयाच्या घरी मुलीच्या रूपाने आलेल्या शैलपुत्रीच्या हातामध्ये त्रिशुल आणि कमळ असतं. ती बैलावर विराजमान असते.
मंत्र- ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे ॐ शैलपुत्री देव्यै नम: ।।
ब्रह्मचारिणी
ब्रह्मचारिणी ही नवदुर्गेमधील दुसरी देवी आहे. ब्रह्म शब्द चा अर्थ तपस्या. तिच्या एका हातामध्ये कमळ आणि एका हातामध्ये माळ असते.
मंत्र- या देवी सर्वभूतेषु माँ ब्रह्मचारिणी के रूप में संस्था। नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नम: ।
चंद्रघंटा
दुर्गेचं तिसरं रूप हे चंद्रघंटा आहे. नवरात्रीच्या तिसर्या दिवशी तिचं पूजन केले जातं. तिच्या डोक्यावर चंद्र आहे. तर शरीत सोन्याप्रमाणे कांतीमय आहे. सिंह हे तिचं वाहन आहे.
मंत्र: पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता। प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता।।
कुष्मांडा
दुर्गेचे चौथं रूप कुष्मांडा आहे. मंद आणि स्मितहास्यामुळे तिचं नाव कुष्मांडा ठेवण्यात आलं आहे.
दुर्गेच्य या रूपाची आराधना करणारी व्यक्ती मुक्त होते आणि तिला सुख समृद्धी प्राप्त होते अशी आराधना आहे.
मंत्र- 'ॐ कूष्माण्डायै नम:।।
स्कंदमाता
दुर्गेच्या पाचव्या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखलं जातं. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी तिचं पूजन होतं.
मंत्र- ॐ देवी स्कन्दमातायै नमः॥
कात्यायनी
सिद्धिदात्री
दुर्गेचं नववं आणि शेवटचं रूप हे सिद्धीदात्री आहे. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी तिची आराधना केली जाते. तिच्या उपासनेने मनोकामना पूर्ण होतात.
मंत्र- ॐ सिद्धिदात्र्यै नम:।
भारतामध्ये नवरात्रीचा जागर हा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. उत्तर भारत आणि गुजरात मध्ये नवरात्रीची विशेष धूम असते. तर महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठांमध्ये विशेष स्वरूपात नवरात्र साजरी होते. सोबतच भोंडला खेळला जातो. तर पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा साजरी केली जाते.
0 टिप्पणियाँ