सारे एकच आम्ही- मराठी शाळेच्या परिपाठातील सुंदर देशभक्तीपर गीत
वेगवेगळी माती जरीही एकच आहे भूमी अशा सुंदर आशयपूर्ण वाक्याने सुरू होणारे हे देशभक्तीपर सारे एकच आम्ही गीत शब्दगणिक सर्वांगसुंदर होत जाते. भारतातील विविध धर्मातील एकता अत्यंत सुंदर रीतीने ह्या गीतात मांडण्यात आली आहे. सारे एकच आम्ही या नावाप्रमाणेच हे गाणे सर्व भारतीय लोकांना एकात्मतेचा संदेश देते. धर्म, जात, वंश, वेष, भाषा, सण हे वेगवेगळे असले तरीही सर्व लोक पाहिले भारतीय आहेत, हे सांगणारे हे गीत प्रखर राष्ट्रवादाची खरी व्याख्या अधोरेखित करते.
चला तर पाहूया ह्या गीताचे सुंदर बोल- सारे एकच आम्ही
सारे एकच आम्ही
हिंदू मुस्लिम शीख अन खिस्ती सारे एकच आम्ही
कुणी उडियाळी कुणी मराठा कुणी तामिळी अप्पा
अय्यो अय्यो करता करता रंगुनी जाती गप्पा
आड न येई भाषा अथवा वेष आनी कमी
हिंदू मुस्लिम शीख न खिस्ती सारे एकच आम्ही
कुठे बसंती कुठे पंचमी अथवा दुर्गा माता
पोळा पोंगल इदही राहो इथेही नांदे समता
रंग ढंग जरी वेगवेगळे प्रेम दिसे हो नामी
हिंदू मुअळिं शीख न खिस्ती सारे एकच आम्ही
कुचुपुडी वा मणिपुरी असो भांगडा प्यारा
आनंदाने फुलून उठतो भारत वर्षही सारा
नृत्य संस्कृती असे संगती धर्म ना कुठला सरशी
हिंदू मुस्लिम शीख न खिस्ती सारे एकच आम्ही
उच्च निचता नाही मूळची जाती भेद
सर्व धर्म समभाव सांगती आचरण व्हावे शुद्ध
घडो न हिंसा हातून माझ्या हीच इच्छा मनी
हिंदू मुस्लिम शीख न खिस्ती सारे एकच आम्ही
आशा आहे तुम्हाला हे सारे एकच आम्ही गीत आवडलं असेल. आमच्या वेबसाईट hindimahiti.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
0 टिप्पणियाँ